उच्च शिक्षण सर्वेक्षण अभियान यशस्वीपणे राबवा : डॉ. शैलेंद्र देवळाणकर

उच्च शिक्षण सर्वेक्षण अभियान यशस्वीपणे राबवा : डॉ. शैलेंद्र देवळाणकर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून सांख्यिकी विभागाने सर्वेक्षणात महाविद्यालय, विद्यापीठांची माहिती अचूक भरून अभियान यशस्वीपणे राबावावे, असे मत उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी व्यक्त केले. उच्च शिक्षण संचालनालयाच्यावतीने महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठे व काही निवडक महाविद्यालये यांच्यासाठी अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण कार्यक्रमाअंतर्गत विद्यापीठात आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र- कुलगुरू डॉ.पराग काळकर, कुलसचिव डॉ. विजय खरे, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव, शिक्षण मंत्रालयाचे सहाय्यक संचालक सौरभ कांत आदी उपस्थित होते. कुलगुरू डॉ. गोसावी म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. माहिती संकलित करण्याचे काम खूप अवघड असून जास्तीत जास्त अचूक माहिती संकलित करण्यात यावी. नवीन धोरण आणि पुढच्या गोष्टीचे नियोजन सर्वेक्षणातील माहिती खूप महत्त्वाची आहे. प्रास्ताविकात कोरडे यांनी सर्वेक्षणाविषयी माहिती दिली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news