Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी | पुढारी

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमिताभ बच्चन यांच्यावर कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात अँजिओप्लास्टी झाली.  (Amitabh Bachchan) आज सका‍ळी कोकिलाबेन रुग्णालयात ते दाखल झाले होते. (Amitabh Bachchan )

बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन ८१ वयाचे आहेत. बिग बी आज शुक्रवारी सकाळी ६ वाजता मुंबईतील कोकिलाबेन रुग्ऩालयात दाखल करण्यात आले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, बिग बींना सकाळी मोठ्या सुरक्षा व्यवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले.

दरम्यान, बिग बींनी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी लिहिलंय- T 4950 – in gratitude ever ..

या ट्विटवरून कयास लावला जात आहे की, सर्जरीनंतर त्यांनी शुभचिंतकांचे आभार मानले आहेत.

Back to top button