तोतया कस्टम ऑफीसर ईराणीसह पोलिसांची टीम
तोतया कस्टम ऑफीसर ईराणीसह पोलिसांची टीम

तोतया कस्टम अधिकारी जाफर इराणीला पुणे पोलिसांकडून बेड्या

Published on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

हरियाणा आणि दिल्ली राज्यात दाखल असलेल्या तब्बल 22 गुन्ह्यांत वॉंटेड असलेल्या व शिवाजीनगर परिसरात वेशांतर करून राहणारा तोतया कस्टम अधिकारी जाफर अली खान इराणी ( 30, ईराणी, वस्ती शिवाजीनगर) याला शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

हरियाणा पोलिसांनी 45 लाखाचे सोने चोरल्याप्रकरणी त्याला अटक केली होती. तेथे पोलिसांना संमोहित करुन पळून गेल्यानंतर सात पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले होते. यामुळे हरियाणा पोलिसही त्याच्यामागावर होते.

पोलिसांना बघून पळण्याच्या तयारीत असताना पकडले

शिवाजीनगर पोलीस रविवारी ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना इराणी वस्ती विष्णूकृपानगर शिवाजीनगर येथे एक व्यक्ती त्यांना बघुन पळून जाऊ लागला होता. त्याला पाठलाग करुन त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने जाफर इराणी असे नाव सांगितले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याला नुकतेच कोंढवा पोलिसांनी अटक केले होते. या गुन्हयात तो जामिनावर बाहेर आलेला असल्याचे समजले. तसेच तो श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात पाहिजे असले बाबत माहिती प्राप्त झाली. तसेच हरियाणा व दिल्ली येथे मोस्ट वॉन्टेड असून तो एकूण 22 गुन्ह्यांमध्ये पाहिजे असल्याबाबत माहिती मिळाली. त्यापैकी हिसार पोलीस स्टेशन हरियाणामध्ये दाखल गुन्हयात त्याने कस्टम आधिकारी असल्याची बतावणी करून 1 किलो सोने चोरी केल्याचे समोर आले.

हिसार पोलीस स्टेशन यांनी दाखल गुन्ह्यात आरोपी जाफर अलि खान इराणी यास अटक केले होते, तेव्हा तो त्यांचे अटकेतून पळून गेला होता . त्यावरून हिसार पोलीस स्टेशन चे 7 पोलीस निलंबित केले गेले होते. सदरच्या गुन्ह्यात हरियाणा राज्याचे पोलीस महासंचालक कॉर्डीनेट करत आहेत. सध्या आरोपीस श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई उपायुक्त प्रियांका नारनवरे , सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावंकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिता मोरे, विक्रम गौड पोलिस निरीक्षक (गुन्हे), सहायक पोलिस निरीक्षक उत्तम माने, पोलिस उप निरिक्षक भैरवनाथ शेळके, पोलिस उपनिरिक्षक विनोद महागडे, पोलिस उप निरीक्षक विजय पानकर पो. हवा. बशीर सय्यद, पोलिस नाईक इनामदार, अंमलदार राहुल होळकर, पोलिस अंमलदार अनिकेत भिंगारे, पोलिस अंमलदार माने, पोलिस अंमलदार कोल्हे, पोलिस अंमलदार पुंडे यांनी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news