पुणे : कचर्‍यातून पत्ता शोधून केला दंड महापालिकेची मोहीम

पुणे : कचर्‍यातून पत्ता शोधून केला दंड महापालिकेची मोहीम
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दुर्घटनास्थळी सापडलेल्या एखाद्या पुराव्याच्या आधारावर ज्या प्रकारे आरोपी शोधून त्याच्या मुसक्या आवळल्या जातात. अगदी तशाच प्रकारे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचार्‍यांनी कचर्‍यामधील कागदांची तपासणी करून त्यातून हाती लागणार्‍या पुराव्यावरून संबंधितांचे पत्ते शोधून दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत कोथरूड-बावधन परिसरातील 35 जणांकडून दंड वसूल करण्यात आला आहे.

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेसाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून शहरात स्वच्छता मोहीम राबविली जाते. तसेच कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकून घाण करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, अनेक वेळा रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जातो, त्यामुळे घाण करणार्‍यांना पकडणे व त्याच्याकडून दंड वसूल करणे शक्य होत नाही. त्यामुळे महापालिकेच्या कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाने पत्ते शोधमोहीम हाती घेतली आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी कारवाई केली जात आहे.

या कारवाईअंतर्गत गेल्या महिन्याभरात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणार्‍या 35 जणांवर कारवाई करून 50 हजार रुपयांचा दंडही वसूल केला आहे. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे, आरोग्य निरीक्षक करण कुंभार, सचिन लोहकरे, मोकादम वैजीनाथ गायकवाड व आण्णा ढावरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

प्रामुख्याने डहाणूकर कॉलनी, लक्ष्मीनगर, स्मृतिवन परिसर, कमिन्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या मागील रस्त्यावर तसेच गोपीनाथ नगर, सहजानंद व कुमार परिसर व कोथरूड गावठाण परिसरात सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकला जात होता, ही बाब लक्षात आल्यानंतर क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून परिमंडळ 2 चे उपायुक्त संतोष वारूळे आणि महापालिका सहाय्यक आयुक्त केदार वझे यांच्या सूचनेनुसार, प्रत्येकी 3 कर्मचार्‍यांची पत्ते शोधपथके नेमली आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news