Radhakrishna Vikhe Patil | पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण झाल्याचा मला आनंदच : मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोलापुरात धनगर आरक्षणासाठी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. दरम्यान, सोलापुरात राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा फेकण्यात आला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी एक्सवर (ट्विटर) वर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. "पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण झाल्याने मला आनंदच. भंडारा उधळणाऱ्यांवर कोणतीही कारवाई नको. धनगर आरक्षणा संदर्भातील कृती समितीच्या भावनांबद्दल सरकार संवेदनशील!" असे राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.  (Radhakrishna Vikhe Patil )

विखे पाटील यांच्यावर भंडारा फेकला

मराठा आरक्षणानंतर आता धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा पुढे आला असून, धनगर समाजाचे सामाजिक कार्यकर्ते शेखर बंगाळे यांनी आज (शुक्रवार) पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर शासकीय विश्रामगृहात भंडारा फेकून धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी केली. दरम्यान यावेळी उपस्थित अंगरक्षक आणि सोलापुरातील भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी त्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्याला पकडून मारहाण केली.

Radhakrishna Vikhe Patil : धनगर समाजाला आरक्षण मिळावे 

एकीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. त्यानंतर आता धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पुन्हा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी नियोजन बैठका घेऊन मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी शासकीय विश्रामगृहात ते विविध नागरिकांचे निवेदन घेत होते. याच वेळी धनगर समाजाचे सामाजिक कार्यकर्ते शेखर बंगाळे व त्यांचे कार्यकर्ते सात रस्त्यातील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदन दिले. कित्येक वर्षांपासून धनगर समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहे, लवकरात लवकर आरक्षण द्या असे बोलत असताना अचानक खिशामध्ये हात घालीत कागदामध्ये गुंडाळून आणलेला भंडारा पालकमंत्र्यांच्या अंगावर फेकला. येळकोट येळकोट जय मल्हार, धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी उपस्थित बॉडीगार्ड, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी त्या कार्यकर्त्याला मारहाण केली व पोलिसांच्या ताब्यात दिले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news