

मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : कळंब (ता. आंबेगाव) येथील ओढ्याजवळ सोमवारी (दि. 19) पहाटे द्राक्ष बागायतदार नीलेश कानडे आणि शेतकरी सुरेश वाव्हळ शेतात पाणी भरण्यासाठी चारचाकी वाहनातून जात असताना त्यांना बिबट्या दिसला. सदाशिव कानडे यांच्या चिकूबागेसमोर पिकांना पाणी देण्यासाठी कानडे आणि वाव्हळ जात होते.
अचानक बिबट्याच्या डोळ्यावर गाडीचा प्रकाश पडताच बिबट्याने झुडपामध्ये पळ काढला. वन विभागाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वस्तीवर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रमोद कानडे, उद्योजक विष्णू कानडे, द्राक्ष बागायतदार अनिल कानडे, नीलेश कानडे यांनी केली आहे. येथे एक बिबट्याची मादी आणि तिची तीन पिले कामगारांनी पाहिल्याचे अनिल कानडे यांनी सांगितले.
रात्री शेतामध्ये जाताना शेतकर्यांनी हातामध्ये घुंगरांची काठी, बॅटरी तसेच एखाद्या व्यक्तीला सोबत घेणे गरजेचे आहे, असे मंचर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी सांगितले.
हेही वाचा