नाशिक : सावधान! महापालिकेचे प्रशासन झोपलेले आहे | पुढारी

नाशिक : सावधान! महापालिकेचे प्रशासन झोपलेले आहे

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड येथील प्रभाग क्र.२० मधील सद्गुरूनगर येथील विविध समस्यांबाबत निवेदने देऊनही महापालिका कार्यवाही करत नसल्याने मनसेने सदगुरूनगर उद्यानाच्या प्रवेशव्दाराला सावधान…. प्रशासन झोपलेले आहे, असा फलक लावत निषेध नोंदवला.

मनसेचे शहर संघटक अ‍ॅड. नितीन पंडित, निरीक्षक पूर्व विधानसभाप्रमुख प्रमोद साखरे, मनविसेचे नितीन धानापुणे, शशी चौधरी, विनायक पगारे, अ‍ॅड. योगेश शिरसाठ, मीरा आवारे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. गेल्या आठवड्यात मनसेने नाशिकरोड विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. अधिकाऱ्यांनी भेटण्याचे मान्य करूनही त्यांनी भेट टाळल्याने मनसेने त्यांच्या केबिनच्या दरवाजाला निवेदन चिकटवून निषेध व्यक्त केला होता. तरीही कार्यवाही होत नसल्याने मनसेने सद्गुरूनगर येथे दुरवस्थेतील उद्यानाला फलक लावून निषेध व्यक्त केला.

फलकाचा आशय असा

प्रशासनाला स्वच्छता करण्यासाठी वेळ नाही. सदगुरू उद्यानात जायचे असेल तर आपल्या जबाबदारी वर जा, उद्यानात साफसफाई होत नाही व त्यामध्ये जंगली झाडे, कचरा व सापांचे बिळे आहेत. उद्यानाचे प्रवेशव्दार खराब झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या जबाबदारीवर उद्यानात जावे.

हेही वाचा:

Back to top button