ढगाळ वातावरणामुळे मुळशीतील शेतकरी अडचणीत

खारावडे : पुढारी वृत्तसेवा :  मुळशी तालुक्यातील बहुतांश भागात बुधवारी (दि. 8) दुपारच्या सुमारास हलका पाऊस पडला. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढग दाटून येत होते. परंतु आज झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ झाली. मुठा व मोसे खोऱ्यातील 30 टक्के भातकापणी पूर्ण झाली आहे. बळीराजाने भातकापणी करून शेतामध्ये ठेवलेले भात हे पूर्णपणे भिजले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

अचानक आलेल्या पावसामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. जेव्हा पावसाची गरज होती तेव्हा तो आला नाही आणि आता अचानक पडल्यामुळे 'दुष्काळात तेरावा महिना' अशी गत येथील बळीराजाची झाली आहे. या ढगाळ वातावरणामुळे उभ्या भात पिकांवर रोगराई पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, नुकसान झालेल्या भात पिकाचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news