पिंपरी : वडिलांविषयी व्यक्त केली कृतज्ञता

पिंपरी : वडिलांविषयी व्यक्त केली कृतज्ञता
Published on
Updated on

पिंपरी(पुणे) : 'फादर्स डे' निमित्त रविवारी(दि. 18) घरोघरी वडिलांना भेटवस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. त्याचप्रमाणे, वडिलांचा फोटो, विविध फोटोंची व्हिडिओ क्लीप तयार करुन व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदींवर स्टेट्स ठेवले होते. प्रत्येकाच्या आयुष्यात जसे आईचे स्थान महत्त्वपूर्ण आहे, तितकेच महत्त्वाचे स्थान वडिलांचे देखील आहे. आई आणि वडील हे नाण्याच्या दोन बाजू आहेत. आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मदर्स डे साजरा केला जातो तर, वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फादर्स डे साजरा करण्यात येतो. दरवर्षी जून महिन्याच्या तिसर्‍या रविवारी हा विशेष दिवस साजरा करण्यात येतो.

'फादर्स डे' आणि त्यातच रविवारची सुट्टी असल्याने अनेक जणांनी वडिलांसोबत बाहेर फिरायला जाण्याचे बेत केले होते. त्याचप्रमाणे, हॉटेलमध्ये जेवणाचे बेतही ठरले होते. तसेच, वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना आकर्षक भेटवस्तू आणि शुभेच्छा देण्यात आल्या. त्याचप्रमाणे, सोशल मिडियावर देखील दिवसभर शुभेच्छांची बरसात सुरु होती. व्हॉटसअप,फेसबुक, इन्स्टाग्रामवर वडिलांविषयीचे शुभेच्छा संदेश फिरत होते. तसेच, काही जणांनी वडिलांवरील छोटे-छोटे रील्स बनवुन ते सोशल मिडियावर 'व्हायरल' केले होते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news