जेजुरी: जागेअभावी उद्योगवाढीचा विस्तार थांबला; एकही वाहननिर्मिती उद्योग नाही

जेजुरी: जागेअभावी उद्योगवाढीचा विस्तार थांबला; एकही वाहननिर्मिती उद्योग नाही
Published on
Updated on

नितीन राऊत

जेजुरी : जेजुरी औद्योगिक वसाहतीत सध्या 225 लहान-मोठे कारखाने सुरू आहेत. एमआयडीसीने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांमुळे कारखानदारीसाठी येथे पोषक वातावरण आहे. मात्र, वसाहतीत जागा उपलब्ध नसल्याने उद्योगवाढीवर मर्यादा आल्या आहेत. महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या माध्यमातून दळणवळण, पाणी सुविधा निर्माण केल्या आहेत. मात्र, या सुविधा वापरासाठी उद्योगांचा विस्तार होणे आवश्यक आहे. जेजुरी हे महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबादेवाची तीर्थक्षेत्र नगरी आहे. सन 1988 मध्ये शासनाने जेजुरी व परिसरात औद्योगिक वसाहत सुरू केली.

231 हेक्टर (सुमारे 688 एकर) क्षेत्रात 341 लहान-मोठ्या उद्योगांना एमआयडीसीच्या माध्यमातून प्लॉट, तसेच 5 मोठे व्यावसायिक प्लॉट दिले गेले आहेत. यासोबतच येथे 13 निवासी प्लॉट मंजूर आहेत. सध्या जेजुरी औद्योगिक वसाहतीत 270 पैकी 225 लहान-मोठे कारखाने सुरू आहेत. यामध्ये इंडियाना, शालिना, हेंकल, क्रोनीक्रेन, आकृती फार्मा, इंदू फार्मा, राज इंडस्ट्रीज आदी मध्यम प्रकल्प वगळता सर्व लघुउद्योग आहेत. साधारपणे या उद्योग समूहात पाच हजार कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या औद्योगिक वसाहतीनजीक 348 एकरांत आयएसएमटी हा अलोर्च स्टीलनिर्मितीचा मोठा उद्योग आहे. या कंपनीत 1100 कामगारांना रोजगार मिळत आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने या उद्योग समूहांना पाणी, रस्ते, पथदिवे या मूलभूत गरजा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. या वसाहतीत आठ किलोमीटरचे डांबरी रस्ते, पथदिवे याचबरोबर नाझरे धरण व वीर धरणांतून भरपूर पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या वसाहतीत इंजिनिअरिंग उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, एकही वाहननिर्मिती उद्योग नसल्याने इतर लहान-मोठ्या उद्योगवाढीला मर्यादा आल्या आहेत.

जेजुरी एमआयडीसीतील उद्योग समूहासाठी वीज, पाणी, दळणवळण याबाबत सुविधा चांगल्या आहेत. वीर धरणावरील पाणी योजना खर्चीक आहे. वीर धरणातून दररोज 2100 घनमीटर (2 कोटी 10 लाख लिटर) पाणी उपलब्ध होण्याची क्षमता आहे. मात्र, एवढे पाणी वापरासाठी मोठे उद्योग या वसाहतीत नाहीत. त्यामुळे ही योजना खर्चीक आहे.

– डॉ. रामदास कुटे, अध्यक्ष, जेजुरी उद्योजक संघटना जेजुरी उद्योग समूहातील काही कारखाने.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news