Pudhari 'RiseUp' Women Kabaddi Tournament: पुण्यात ‘राईज अप’ महिला कबड्डी स्पर्धेत डॉ. पतंगराव कदम संघाची दुहेरी बाजी

कडाक्याच्या थंडीतही ९२ संघांचा थरार; कुमारी गटात एस.बी. स्पोर्ट्स (पळसदेव)चे वर्चस्व
Pudhari 'RiseUp' Women Kabaddi Tournament
Pudhari 'RiseUp' Women Kabaddi TournamentPudhari
Published on
Updated on

पुणे: कडाक्याच्या थंडीतही पुण्याच्या मैदानात कबड्डीच्या अटीतटीच्या लढतींनी क्रीडाप्रेमींचा उत्साह ओसंडून वाहिला. दै. ‌‘पुढारी‌’ आयोजित आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने राईज अप महिला कबड्डी स्पर्धेत डॉ. पतंगराव कदम महिला कबड्डी संघाने आपल्या अनुभवाच्या जोरावर दुहेरी मुसंडी मारली, तर एस. बी. स्पोर्ट्‌‍स (पळसदेव) संघाने कुमारी गटात आपले वर्चस्व सिद्ध केले.

Pudhari 'RiseUp' Women Kabaddi Tournament
Delhi Blast Pune Connection: दिल्ली स्फोटाच्या ‘पुणे कनेक्शन’चा उलगडा; खोट्या कॉलमागचे सत्य उघड

या महिलांच्या कबड्डी स्पर्धा नेहरू स्टेडियमच्या मैदानावर रंगल्या. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण अर्जुन पुरस्कारविजेते शांताराम जाधव, व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष बांदल, संचालिका जयश्री बांदल, कबड्डी असोसिएशनचे संदीप पायगुडे, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त शोभा भगत-शिंदे, राष्ट्रीय कबड्डीपटू शीतल मारणे, पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. कल्याण शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. ‌‘पुढारी‌’ मार्केटिंग विभागप्रमुख संतोष धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले.

Pudhari 'RiseUp' Women Kabaddi Tournament
Pune Minor Delivery Case: पुण्यात धक्कादायक प्रकार; १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची घरात एकटीने प्रसूती

या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरलेल्या ‌‘खुला गट‌’ आणि ‌‘किशोरी गटात‌’ डॉ. पतंगराव कदम महिला कबड्डी संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी संघांना नामोहरम करीत त्यांनी विजेतेपदावर आपले नाव कोरले. किशोरी गटात डॉ. पतंगराव कदम संघाने प्रथम, तर भैरवनाथ कबड्डी संघ (वडगाव धायरी) द्वितीय क्रमांकावर राहिला. कला क्रीडा (चिंचवड) आणि लोकश्री क्रीडा ज्ञानपीठ ट्रस्ट यांनी अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांक मिळवत चुरस निर्माण केली. कुमारी गटात पळसदेवच्या एस. बी. स्पोर्ट्‌‍स संघाने तांत्रिकदृष्ट्या सक्षम खेळ करीत प्रथम क्रमांक मिळविला. बह्म विष्णू महेश संघाने त्यांना चांगली झुंज देत दुसरे स्थान मिळविले. राणाप्रताप संघाने तृतीय, तर राजमाता जिजाऊ संघाने चौथा क्रमांक पटकाविला. खुल्या गटामध्ये अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या डॉ. पतंगराव कदम संघाने पुन्हा एकदा बाजी मारली. राजमाता जिजाऊ संघ द्वितीय, चिंचवडचा बह्म विष्णू महेश संघ तृतीय, तर कला क्रीडा विकास प्रकल्प संघ चौथ्या क्रमांकाचा विजेता ठरला.

Pudhari 'RiseUp' Women Kabaddi Tournament
Pune Deputy Mayor Parshuram Wadekar: पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर; चळवळीतील कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंतचा प्रवास

या स्पर्धेत किशोरी गटात 34, कुमारी गटात 34 आणि खुल्या गटात 24 असे एकूण 92 महिलांचे संघ आणि तब्बल 1300 हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत वडगाव घेनंद, घोडेगाव, पिंपरी-चिंचवड, भोसरी, चिखली, इंदापूर, वडगाव शेरी आणि पुणे शहर येथून संघ सहभागी झाले होते. सध्या विविध स्पर्धांचा काळ असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी झाली, हे या स्पर्धेचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर माणिकचंद ऑक्सिरिच असून, फायनान्स पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी, ॲकेडमिक पार्टनर सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट हे आहेत. सहप्रायोजक अदानी, तर असोसिएट पार्टनर व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज, के. जे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स ट्रिनिटी, अमनोरा पार्क टाऊन, सपोर्टिंग पार्टनर पुणे महापालिका यांचे सहकार्य मिळाले आहे.

Pudhari 'RiseUp' Women Kabaddi Tournament
Pune mayor Manjusha Nagpure: पुण्याच्या महापौरपदी मंजूषा नागपुरे बिनविरोध; विकासाचा स्पष्ट अजेंडा मांडला

अष्टपैलू खेळाडूंनी वेधले लक्ष...

सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते अष्टपैलू खेळाडूंनी. रोशनी कोंढाळकर, समृद्धी बनसोडे, सानिका खाडे यांनी चढाया आणि बचाव अशा दोन्ही आघाड्यांवर चमकदार कामगिरी करीत ‌‘बेस्ट ऑलराउंडर‌’ म्हणून नाव कमावले. या स्पर्धेचे नियोजन संतोष जगदाळे, इमान शेख, सागर वाळके आणि संदीप पायगुडे यांनी केले. या सामन्यांमध्ये विशेषतः ‌‘प्लेअर ऑफ द डे‌’ ठरलेल्या समीक्षा देवाडे, सानिका धायरकर, रिया धुमाळ, वंदना राठोड, सलोनी साळवी आणि ईशिता गुजर यांच्या खेळाचे विशेष कौतुक झाले. सर्व विजेत्या, उपविजेत्या आणि प्रथम चार क्रमांकांचे संघ तसेच वैयक्तिक विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र आणि करंडक देण्यात आले.

वैयक्तिक कौशल्याचा ‌‘दरारा‌’

केवळ सांघिक यशच नाही, तर काही खेळाडूंनी आपल्या वैयक्तिक कामगिरीने प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवला. अनन्या चवरकर, सई शिंदे आणि आराध्या दोंडकर यांनी आपल्या चित्तथरारक चढाईने सर्वांची मने जिंकली, तर बचावात्मक खेळात नंदिनी साधू, संतोषी थोरवे आणि प्रीती कुरडकर यांनी प्रतिस्पर्ध्यांच्या चढाया मोडून काढत‌ ‘बेस्ट डिफेंडर‌’चा किताब पटकावला.

Pudhari 'RiseUp' Women Kabaddi Tournament
Pune Municipal Mayor Election: महापौर निवडणुकीत काँग्रेसची माघार, भाजपला बिनविरोध वाटचाल

या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मातीतील खेळाला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र मैदानावर दिसून आले. ग््राामीण आणि शहरी भागातील मुलींच्या कबड्डी कौशल्याला मोठे व्यासपीठ मिळाले असून, नवोदित खेळाडूंना राष्ट्रीय कबड्डीपटूंचाही खेळ पाहता आला आहे. ‌‘पुढारी‌’ने या स्पर्धा केवळ जिल्हापातळीवर न ठेवता राज्यात कबड्डी पोहचवावी.

शांताराम जाधव, अर्जुन पुरस्कारप्राप्त कबड्डीपटू

दै. ‌‘पुढारी‌’च्या वतीने केवळ महिलांसाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. आत्तापर्यंत पुढारी आयोजित सर्वच स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. कबड्डी स्पर्धेतील मुलींचा सहभाग वाखाणण्याजोगा आहे. ‌‘पुढारी‌’च्या या उपक्रमाला कायम शुभेच्छा आहेत. अतिशय अतितटीचे सामने पाहण्याचा आनंद मिळाला.

संतोष बांदल, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news