Pune Market Yard Prices: मान्सूनच्या विलंबाचा परिणाम! पुण्यात साखर, खाद्यतेल, डाळींसह जीवनावश्यक वस्तू महागल्या

पेरण्या खोळंबल्याने आणि पुरवठा घटल्याने बाजारात तेजी; श्रावणपूर्वी उपवासाच्या पदार्थांच्या दरवाढीचे संकेत
Oil And Pulses
Oil And PulsesPudhari
Published on
Updated on

पुणे: लांबलेल्या मान्सूनमुळे पेरण्या खोळंबणे, अन्नधान्याची आवक घटणे आणि दक्षिण आशियातील युद्धस्थितीमुळे संभाव्य तुटवड्याची भीती याचा परिणाम पुण्यातील मार्केट यार्डातील गूळ-भुसार बाजारावर दिसून येत आहे. त्यामुळे खाद्यतेल, साखर, गहू, ज्वारी, कोलम तांदूळ, उडीद डाळ, हरभरा डाळ आणि बेसनच्या भावात वाढ झाली असून, काही जीवनावश्यक वस्तूंचे दर तेजीत आहेत.

Oil And Pulses
Chakan Vegetables Rates: चाकण मार्केट यार्डमध्ये डांगर भोपळा, मिरची, कांद्याची मोठी आवक; मेथी-कोथिंबीरच्या दरात घसरण

घाऊक बाजारात साखरेच्या भावात आठवडाभरात किलोमागे ५ रुपयांची वाढ झाली आहे. तर खाद्यतेलाच्या १५ किलो/लिटरच्या डब्यामागे २५ ते ५० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली. कोलम तांदळाच्या भावात किलोमागे ३ ते ४ रुपये, गव्हात ५० पैसे आणि ज्वारीत १ रुपयांची वाढ झाली आहे. प्रक्रिया उद्योगांकडून वाढलेल्या मागणीमुळे गव्हाचे दर वधारल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. लांबलेल्या पावसामुळे उडीद डाळीच्या भावात किलोमागे तब्बल ८ रुपये, तर हरभरा डाळीच्या भावात ३ रुपयांची वाढ झाली आहे. बेसन २ रुपयांनी महागले आहे. रवा, आटा आणि मैद्याच्या दरातही प्रत्येकी १ रुपयांची वाढ झाली आहे. येत्या काळात डाळींच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

Oil And Pulses
Pune Fish Prices: आषाढात मासळी महागली! पुण्यात दरात १० ते २० टक्क्यांची वाढ; मटण-चिकनचे भाव स्थिर

बाजारभाव पुढीलप्रमाणे:

साखर (प्रतिक्विंटल) ४७००-४७५० रु. खाद्यतेले (१५किलो/लिटर) :- शेंगदाणा तेल २६५०-२९००, रिफाईंड तेल २४००-३२००, सरकी तेल २२५०-२७५०, सोयाबीन तेल २२००-२६००, पामतेल २२००-२५००, सूर्यफूल रिफाईंड तेल २३५०-२५५०, खोबरेल तेल ४०००, वनस्पती २२७०-२६०० रु. तांदूळ:- गुजरात उकडा ४३००-४६००, मसुरी ३५००-३७००, सोना मसूरी ५५००-५८००, एच.एम.टी. कोलम ६५००-७०००, लचकारी कोलम ७०००-७५००, चिन्नौर ७५००-८०००, ११२१-११५००-१२५००, आंबेमोहोर (सुवासिक) १४५००-१६५००, बासमती अखंड १२५००-१४५००, बासमती दुबार १००००-१०५००, बासमती तिबार १०५००-११०००, बासमती मोगरा ६०००-६५००, बासमती कणी ४५००-५०००, १५०९-१०००-११०००, इंद्रायणी ६००० रु. गहू - लोकवन नं. १ ४२५०-४६००, लोकवन नं. २ ३८००-४१००, नं.३ ३२५०-३८००, सिहोर नं. १ ५९००-६५००, सिहोरी ३८५०-४५५०, मिलबर ३०५०-३१५० रु. ज्वारी :- गावरान नं. १ ५९००-६७००, गावरान नं.२ ५२००-५५००, नं.३ ४७००-५२००, दूरी नं.१ ३८००-४०००, दूरी नं. २ ३५००-३७०० रु बाजरी:- महिको नं.१ ३४००-३७००, महिको नं.२ ३१००-३३००, गावरान ३०००-३२००, हायब्रीड २८५०-३०००रु.

Oil And Pulses
IMA Strike Postponed: आयएमएचा २० जुलैचा कामबंद स्थगित; मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर निर्णय

गूळ :- गूळ नं. १ ४७००-४८५०, गूळ नं.२ ४५२५-४६५०, गूळ नं.३ ४४००-४४७५, बॉक्स ४७००-५६०० रु. डाळी:- तूरडाळ १००००-१२५००, हरभराडाळ ७५००-७७००, मूगडाळ ९०००-१००००, मसूरडाळ ७४००-७५००, मटकीडाळ ९०००-९२००, उडीदडाळ १००००-१३५०० रु. कडधान्ये:-हरभरा ७३००-७७००, हुलगा ६६००-७२००, चवळी ८३००-१०७००, मसूर ७५००-८२००, मूग ९३००-१२४००, मटकी गावरान १५५००-१७५००, मटकी पॉलिश ८५००-९०००, मटकी गुजरात १६५००-१७५००, मटकी राजस्थान ७५००-८८००, मटकी सेलम १७५००-१८८००, वाटाणा हिरवा ५२००-५६००, वाटाणा पांढरा ४८००-५२००, काबुली चणा ७६००-११००० रु. साबुदाणा :-साबुदाणा नं.१ ७०००, साबुदाणा नं.२ ६५००, साबुदाणा नं.३ ६२०० रु. वरई भगर :-२००००-२१०००, सावा भगर १९०००-२०००० रु. गोटा खोबरे ३६०००-४०००० रु. शेंगदाणा :- जाडा ११७००-१३०००, स्पॅनिश–१४०००-१५०००, घुंगरु १३०००-१४००० धने :- गावरान १२०००-१३०००, इंदूर १५०००-१७००० इंदुर सुपर २५०००-३०००० रु. पोहे :- मध्य प्रदेश ४६००-४९००,पेण ४६००-४८००, मध्यम पोहा ४६००-४८००, दगडी पोहा ४८००-५१००, पातळ पोहा ५२००-५८००, रवा, मैदा, आटा- (५० किलोचा भाव) आटा १६५०-१७५०, रवा १७००-१८००, मैदा १७००-१८००, बेसन:- (५० किलोस) ४२००-४६५० रु.

Oil And Pulses
Pune Juvenile Escape: पुण्यात धक्कादायक प्रकार! निरीक्षणगृहात नेताना तीन विधिसंघर्षित बालकांचे पलायन; दोघे ताब्यात, एकाचा शोध सुरू

उपवासाच्या पदार्थांना तेजी; श्रावणात आणखी दरवाढीचे संकेत

आषाढी एकादशी वारीमुळे उपवासासाठी लागणाऱ्या साबुदाणा, भगर आणि राजगिराच्या खरेदीला वेग आला आहे. त्यातच श्रावण महिना आणि पुढील धार्मिक सणांची चाहूल लागल्याने बाजारात या वस्तूंची मागणी सातत्याने वाढत आहे. यंदा उत्पादनात घट झाल्याने पुरवठा मर्यादित असून, त्याचा थेट परिणाम दरांवर झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत साबुदाण्याचे दर अधिक असून, आगामी काळात मागणी वाढल्यास भावात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत. भगरच्या दरातही सध्या तेजी असून, बाजारातील आवक कमी राहिल्यास त्यातही वाढ होण्याची शक्यता मार्केट यार्डातील साबुदाणा आणि भगरचे व्यापारी आशिष दुगड यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news