IMA Strike Postponed: आयएमएचा २० जुलैचा कामबंद स्थगित; मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर निर्णय

डॉक्टरांवरील हल्ल्याची न्यायालयाने घेतली दखल; मागण्या मान्य न झाल्यास ९ ऑगस्टपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा
Bombay High Court
Bombay High Courtpudhari photo
Published on
Updated on

पुणे: डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए व इतर वैद्यकीय संघटनांनी २० जुलै रोजी पुकारलेला 'कामबंद' निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या आवाहनानंतर तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे.

Bombay High Court
Pune Juvenile Escape: पुण्यात धक्कादायक प्रकार! निरीक्षणगृहात नेताना तीन विधिसंघर्षित बालकांचे पलायन; दोघे ताब्यात, एकाचा शोध सुरू

न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेत आरोपीचा जामीन स्थगित केला आणि १९ जुलैपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या सकारात्मक भूमिकेचा आदर करत आणि रुग्णांचे हित लक्षात घेऊन डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतले आहे.

Bombay High Court
Maharashtra Law College BCI Approval: धक्कादायक! राज्यातील १०३ विधी महाविद्यालयांकडे बार कौन्सिलची मान्यता नाही; विद्यार्थ्यांना दिलासा

मात्र, 'महाराष्ट्र आरोग्य सेवा संरक्षण कायदा २०१०' अधिक सशक्त आणि अजामीनपात्र करण्याची मागणी कायम असल्याचे आयएमएने स्पष्ट केले आहे. जर सरकारने याबाबत अध्यादेश काढून मागण्या मान्य न केल्यास, ९ ऑगस्ट पासून राज्यभर बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या वतीने डॉ. संतोष कुलकर्णी, डॉ. विक्रांत देसाई आणि डॉ. अमोल गित्ते यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल, असेही यावेळी डॉ कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news