

अविनाश दुधवडे
चाकण: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये डांगर भोपळा, हिरवी मिरची, कांदा, बटाटा व चवळीची मोठी आवक झाली. मेथी, कोथिंबीर व पालकाच्या भावात घसरण झाली. एकूण उलाढाल ६ कोटी १० लाख रुपये झाली.
कांद्याची एकूण आवक १ हजार ७०० क्विंटल झाली. कांद्याला कमालभाव ८०० ते २,२०० रुपये मिळाला. बटाट्याची एकूण आवक १,५०० क्विंटल झाली. बटाट्याचा कमालभाव १,५०० रुपयांवरच स्थिरावला. लसणाची एकूण आवक ५० क्विंटल झाली. लसणाचा कमालभाव १५ हजार रुपयांवर स्थिरावला. हिरव्या मिरचीची एकूण आवक ३८५ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला ३ हजार रुपयांपासून ते ४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.
शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे- कांदा- एकूण आवक- १,७०० क्विंटल. भाव क्रमांक- १. २,२०० रुपये, भाव क्रमांक २. १,२०० रुपये, भाव क्रमांक ३. ८०० रु. बटाटा- एकूण आवक- १,५०० क्विंटल. भाव क्रमांक १. १,५०० रुपये, भाव क्रमांक २. १,२०० रुपये, भाव क्रमांक ३. ८०० रुपये.
फळभाज्या-एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतिदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात रुपयांत पुढीलप्रमाणे : टोमॅटो - ३३४ क्विंटल (१,००० ते २,०००), कोबी- १९५ क्विंटल (१,००० ते १,६००), फ्लॉवर- २१० क्विंटल (१,००० ते २,०००), वांगी- ८५ क्विंटल (२,५०० ते ४,०००), भेंडी- ९६ क्विंटल (२,००० ते ५,०००), दोडका- ६४ क्विंटल (२,५०० ते ३,५००), कारली- ६८ क्विंटल (३,००० ते ५,०००), दुधीभोपळा- ५२ क्विंटल (१,००० ते २,०००), काकडी- ११५ क्विंटल (१,००० ते २,०००), फरशी- ८ क्विंटल (६,००० ते ८,०००), वालवड- २६ क्विंटल (६,००० ते ७,०००), ढोबळी मिरची- १५५ क्विंटल (३,००० ते ५,०००), चवळी- ४२ क्विंटल (२,००० ते ३,०००), वाटाणा- ३० क्विंटल (१२,००० ते १६,०००), शेवगा- ३५ क्विंटल (५,००० ते ६,०००), गाजर- १८० क्विंटल (१,५०० ते २,५००), गवार- ४८ क्विंटल (४,००० ते ६,०००), आले- १६० क्विंटल (१०,००० ते १५,०००).
पालेभाज्या-पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे-मेथी- एकूण ७ हजार ५८० जुड्या (१,५०० ते ३,००० रुपये), कोथिंबीर-एकूण २१ हजार ९४७ जुड्या (२,००० ते ४,००० रुपये), शेपू-एकूण ३ हजार १६० जुड्या (१,५०० ते २,००० रुपये), पालक-एकूण ३ हजार ७४० जुड्या (१,००० ते १,७०० रुपये).
जनावरे-जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ३२ जर्सी गायींपैकी २७ गायींची विक्री झाली. (१५,००० ते ७०,००० रुपये), ५२ बैलांपैकी ४५ बैलांची विक्री झाली. (१०,००० ते ४०,००० रुपये), ९५ म्हशीं पैकी ८५ म्हशींची विक्री झाली. (३०,००० ते ८०,००० रुपये), १०,५०० शेळ्या-मेंढ्यांपैकी १०,२०० शेळ्यांची विक्री झाली. त्यांना २,००० रुपयांपासून ते १५,००० रुपयांपर्यंत भाव मिळाला.