Madhav Gadgil passes away: भारतात पर्यावरणवादाची बीज रोवणाऱ्या माधव गाडगीळ यांचे निधन

अखेरच्या श्वासापर्यंत निसर्गसंवर्धनासाठी केले काम; दैनिक पुढारीने कव्हर केले होते त्यांचे शेवटचे भाषण
Madhav Gadgil
Madhav Gadgilpudhari photo
Published on
Updated on

​पुणे: भारताचे ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ, पश्चिम घाटतज्ज्ञ समितीचे अध्यक्ष आणि निसर्गप्रेमी डॉ. माधव गाडगीळ यांचे वृद्धापकाळाने आजाराने निधन झाले. वयाच्या ८३ व्या वर्षी पुण्यातील डॉ. शिरीष प्रयाग हॉस्पिटलमध्ये ७ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने पर्यावरण आणि परिसंस्था संवर्धनासाठी सातत्याने आवाज उठवणारा एक विद्वान मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

Madhav Gadgil
संयुक्त राष्ट्राचा 'चॅम्पियन्स ऑफ द अर्थ' पुरस्कार माधव गाडगीळ यांना जाहीर

आज दुपारी 4 वाजता शासकीय इतमामात अंत्यविधी...

​डॉ. गाडगीळ यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्यांच्या 'ए-१८, स्प्रिंग फ्लॉवर अपार्टमेंट, पंचवटी, पाषाण' या निवासस्थानी सकाळी ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर आज, ८ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

​पर्यावरण क्षेत्रातील अतुलनीय योगदान देत डॉ. गाडगीळ यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. निसर्ग आणि पर्यावरणाच्या अभ्यासासाठी समर्पित अखेरच्या श्वासापर्यंत ते झटले.

Madhav Gadgil
Amaravati City Bird | ‘तांबट’ पक्षी ठरला अमरावतीचा अधिकृत ‘सिटी बर्ड’ : पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल

​बिबट हल्यांवर कडक भूमिका: शासकीय यंत्रणावर कडक ताशेरे...

बिबट्याच्या वाढत्या प्रादुर्भावर त्यांनी महाराष्ट्र सरकार आणि सरकारी यंत्रणांवर ककड ताशेरे ओढले होते, कारण जुन्नर आंबेगाव आणि शिरूर या यापुढे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात बिबट्यांचा प्रचंड संस्कार झाल्याने मानवी हलवे वाढले मानवावर त्यांचे हल्ले वाढले होते त्याविषयी दैनिक पुढारीने सातत्याने माधव गाडगीळ यांना बोलती केले तेव्हा त्यांनी अतिशय कडी कडक भूमिका घेतली. " आधी माणसाचा जीव महत्त्वाचा नंतर बिबट्याचा!"त्यामुळे बिबट्यांना गोळ्या घाला ठार मारा"! त्यांची स्तरलायझेशन किंवा नसबंदी करून काही उपयोग होणार नाही कारण बिबट हा मांजर नव्हे तो हातातच लागणार नाही अशी त्यांनी स्पष्ट भूमिका घेतल्याने अखेर वन विभागाने दखल घेऊन राज्य सरकारने एक तातडीची बैठक घेतली आणि थोड्या प्रमाणात का होईना त्यांच्यामुळेच बिबट प्रणव क्षेत्रात खूप उपाययोजना सरकारने केल्या या घटनेला अवघा एक झाला आहे.

पश्चिम घाटासाठी खूप मोठे काम केले

​गाडगीळ समितीचा अहवाल: पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी त्यांनी दिलेला 'गाडगीळ समितीचा अहवाल' आजही पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

​निसर्ग आणि लोकसहभाग: केवळ कायदे करून पर्यावरण वाचणार नाही, तर त्यात स्थानिक लोकांचा सहभाग हवा, असा त्यांचा ठाम आग्रह होता.

​पुरस्कार

त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित केले होते.

Madhav Gadgil
Congress Protest Nagpur | नाग नदीच्या प्रदूषणावर काँग्रेस आक्रमक; दूषित पाण्याचे नमुने पर्यावरण खात्याच्या अधिकार्‍यांकडे सोपविले

शेवटच्या भाषणातही त्यांनी व्यक्त केली होती देवराई बाबत चिंता

महिनाभरापूर्वीच म्हणजे 5डिसेंबर रोजी डॉ. गाडगीळ यांचे अखेर भाषण वनराई संस्थेच्या वार्षिक अंकाच्या प्रकाशनावेळी झाले. त्यावेळी हे भाषण पुढारीने ऑनलाईन कव्हर केले. हेच त्यांचे शेवटचे भाषण ठरले. गाडगीळ सरांची तब्येत बरी नसतानाही काठीचा आधार घेत.धापा टाकते या ठिकाणी आले आणि त्यांनी पोटतिडकीने या विषयावर आपली भूमिका मांडली महाराष्ट्र सह देशातील देवराया अखेरच्या घटका मोजत असून त्याची संरक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी सामान्य नागरिकांनी घ्यावी अशी भूमिका मांडत त्यांनी आपली अखेरची इच्छा व्यक्त केली होती. यावेळी डॉक्टर गाडगे यांची प्रकृती बरी नसतं नाही त्यांनी निसर्ग संवर्धनासाठी हा दिलेला अखेरचा शेवटचा संदेश अत्यंत मोलाचा होता. त्यामुळे त्यांचे भाषण ऐकण्यासाठी व त्यांना पाहण्यासाठी तरुणाई आवर्जून आली होती. सरांचे भाषण ऐकण्यासाठी वनराई संस्थेचा हॉल गर्दीने खचाखच भरला होता. गर्दीने खचाखच भरला होता." देवराया वाचल्या तर माणसे वाचतील,अन्यथा शहरातून निसर्ग पूर्णपणे नाहीसा होईल!" अशी चिंता त्यांनी या अखेरच्या भाषणात व्यक्त केली याची पुढारीकडे असून त्याचे फोटोही अखेरच्या भाषणाचे टिपले आहेत..

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news