Pune Organ Transplant Growth: पुणे विभागात अवयव प्रत्यारोपणात मोठी वाढ; रुग्णांना मिळतेय नवसंजीवनी

गेल्या 5 वर्षांत प्रत्यारोपण रुग्णसंख्या दुप्पट; जागरूकता आणि समन्वयामुळे अवयवदानाला गती
Organ Transplant
Organ TransplantPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे विभागात गेल्या पाच वर्षांत अवयव प्रत्यारोपणाच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती (झेडटीसीसी) आणि पुणे परिमंडळ आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या माहितीनुसार, 2021 मध्ये 44 अवयवदात्यांकडून 97 रुग्णांमध्ये प्रत्यारोपण केले होते. ही संख्या 2025 मध्ये 207 वर पोहोचली आहे. अवयवदात्यांची संख्याही 44 वरून 79 पर्यंत वाढली आहे.

Organ Transplant
Pune Hapus Mango: कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात; कर्नाटक हापूसची आवक वाढली

अवयवदानाबाबत समाजात वाढती जागरूकता, रुग्णालयांमधील समन्वय, तातडीने उभारला जाणारा ग््राीन कॉरिडॉर आणि नातेवाइकांचे प्रभावी समुपदेशन यामुळे प्रत्यारोपण प्रक्रियेला गती मिळाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. विशेषतः मेंदूमृत रुग्णांच्या नातेवाइकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचेही आरोग्य विभागातर्फे सांगण्यात केले.

Organ Transplant
Miraj Kolhapur Railway Double Line: मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्ग दुहेरीकरणाला गती; प्रवास होणार वेगवान

रुग्णाला मेंदूमृत घोषित केल्यानंतर नातेवाइकांचे समुपदेशन केले जाते. नातेवाइकांच्या धाडसामुळे मेंदूमृत रुग्णाकडून हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुप्फुसे, स्वादुपिंड, डोळे आणि त्वचा यांसारखे अवयव दान झाल्याने इतर रुग्णांना नवसंजीवनी मिळणे शक्य झाले आहे. एका दात्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात.

Organ Transplant
Teacher Recruitment Pavitra Portal: पवित्र पोर्टल शिक्षक भरतीला गती; 31 मे 2026 पर्यंत जाहिरातींची अंतिम मुदत

गेल्या पाच वर्षांत मूत्रपिंड आणि यकृत प्रत्यारोपणात सर्वाधिक वाढ झाली आहे. 2021 मध्ये 49 किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या होत्या; ती संख्या 2025 मध्ये 117 वर पोहचली. याच काळात यकृत प्रत्यारोपण 41 वरून 67 पर्यंत वाढले. फुफ्फुस प्रत्यारोपणाची संख्याही शून्यावरून 13 पर्यंत गेली आहे.

Organ Transplant
Pune Fuel Price Hike: युद्धाचा फटका पुणेकरांच्या खिशाला; पेट्रोल-डिझेल-CNG दरवाढीने संताप

अवयवदानाबाबत समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होत असून, अधिकाधिक कुटुंबे पुढाकार घेत आहेत. वेळेवर समुपदेशन आणि यंत्रणांमधील समन्वयामुळे अधिक रुग्णांना नवजीवन देणे शक्य होत आहे.

डॉ. भगवान पवार, आरोग्य उपसंचालक, पुणे परिमंडळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news