पारगाव : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यातील वळतीच्या बबडी वस्तीत ओढ्याचे पाणी घरे, शेतांमध्ये शिरले. वळती परिसरात गुरुवारी ( दि. २८ ) दुपारी पडलेल्या जोरदार पावसामुळे बबडी वस्तीतील ओढ्याला पूर आला . पुराचे पाणी वस्ती मधील घरांमध्ये शिरले. गुरुवारी दुपारी चार वाजता या परिसरात जोरदार पाऊस पडला . यामुळे ओढ्याला पूर येऊन पुराचे पाणी बबडी वस्तीतील घरांमध्ये शिरले.शेतकऱ्यांच्या घराशेजारील असलेल्या जनावरांच्या गोठ्यांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने चारा , पशुखाद्य मोठ्या प्रमाणावर भिजले आहे. घरांमधिल धान्य भिजले आहे .अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.तसेच ओढ्याच्या पुराचे पाणी शेती पिकांमध्ये शिरून आता पिके सडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
गतवर्षी देखील या ओढ्याचे पाणी घरांमध्ये शिरून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.या ओढ्यामधील अतिक्रमण काढण्याचे आदेश प्रशासनाने काढून देखील संबंधित शेतकऱ्यांनी अतिक्रमण काढले नसल्याने बबडी वस्ती मधील शेतकऱ्यांना हा त्रास पावसाळ्यात कायम सहन करावा लागत आहे . वळती गावाच्या उत्तरेला बबडी वस्ती आहे. येथून ओढ्याचे पात्र जात आहे.परंतु पश्चिमेकडील काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने सद्यस्थितीत ओढ्याचे पात्रच शिल्लक राहिलेले नाही.त्यामुळे जोरदार पाऊस पडल्यानंतर ओढ्याला पूर येतो . व पुराचे पाणी थेट बबडी वस्तीतील घरांमध्ये शिरते.
याबाबत स्थानिक शेतकरी विलास बबन भोर दै . पुढारी शी बोलताना म्हणाले "बबडी वस्तीतील ओढ्यात काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले . त्यामुळे ओढ्याचे पात्र आता राहिले नाही . याबाबत वळती गाव तंटामुक्त समिती कडे अनेकदा अर्ज केले . त्यानंतर तालुक्याच्या तहसीलदारांकडे देखील अर्ज केले .तहसीलदारांनी पाहणी करून ओढ्यातील अतिक्रमण काढण्याचे आदेश देखिल दिले . परंतु संबंधित शेतकऱ्यांनी त्या आदेशाला केराची टोपली दाखवली त्यामुळे दर वेळेस जोरदार पाऊस पडल्यानंतर आमच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरूर मोठ्या प्रमाणावर नुकसान होते .
स्थानिक शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात
दर वर्षी पावसाळ्यात ओढ्याच्या पाण्याचा त्रास येथील शेतकऱ्यांना सहन लागतो. प्रशासनाचा आदेश देखिल शेतकरी झुगारत आहेत . त्यामुळे आम्ही बबडी वस्ती मधिल शेतकरी मुलाबाळांसह तहसिल कार्यालयात जाणार आहोत असे स्थानिक शेतकर्यांनी सांगितले .
हे ही वाचा :