पुणे : उत्रौली येथे आगीत शूटिंगचे साहित्य खाक

उत्रौली (ता. भोर) येथे गोडाऊनमधील साहित्याला लागलेली आग.
उत्रौली (ता. भोर) येथे गोडाऊनमधील साहित्याला लागलेली आग.

भोर : पुढारी वृत्तसेवा

भोर – रामबाग रस्त्यावरील उत्रौली गावाच्या हद्दीत ऐतिहासिक चित्रपटाच्या शूटिंगचे साहित्य असलेल्या पाच गोडाऊनला आग लागली. यात सदर साहित्य जळाल्याने सुमारे 8 ते 10 लाखांचे नुकसान झाले. बुधवारी (दि. 1) सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली.

भोरपासून दोन किलोमीटरवरील रामबाग रस्त्यावरील उत्रौली गावाच्या हद्दीत जगन शेटे (रा. उत्रौली, ता. भोर) यांची पाच गोडाऊन एक ऐतिहासिक चित्रपट निर्मात्या कंपनीने भाड्याने घेतली होती. सदर गोडाऊनमध्ये पावनखिंड या चित्रपटासह ऐतिहासिक चित्रपटाला लागणारे तंबू, तलवारी, ढाल, दांडपट्टे, पेटारे, लोखंडी झुंबर, लाकडे, फर्निचर, पुतळे असे साहित्य होते. बुधवारी सायंकाळी सहा वाजता अचानक आग लागून दोन सिलिंडरचा स्फोट होऊन संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. दरम्यान आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही. आगीत सुमारे 8 ते 10 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

भोर नगरपलिकेच्या अग्निशामक दलातील कर्मचारी सागर पवार, रुषी (बाळा) शेटे, आकाश सागळे, दत्तात्रय पवार, आमिर आतार यांच्यासह सह्याद्री सर्च अँड रेस्क्यू फोर्सच्या सदस्यांनी दोन तासांनंतर आग आटोक्यात आणली. पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे, कर्मचारी यांनी या घटनेनंतर या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news