

पुणे : ज्येष्ठ समाजसेवक, कष्टकरी नेते डॉ. बाबा आढाव यांचे सोमवारी (दि. ८) निधन झाले. बाबांनी संपूर्ण आयुष्य कष्टकरी वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी घालवले.
अशा बाबांना श्रध्दांजली वाहण्यासाठी आज (बुधवार दि. १०) मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला, कांदा-बटाटा विभाग बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड कामगार युनियन पुणेचे अध्यक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणेचे संचालक संतोष नांगरे यांनी दिली.
त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीस आणू नये. तसेच, खरेदीदारांनी खरेदीस येऊ नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.