डॉ. अमोल कोल्हेंना हडपसरमधून 17 हजार 958 मताधिक्य!

डॉ. अमोल कोल्हेंना हडपसरमधून 17 हजार 958 मताधिक्य!
Published on
Updated on

[author title="दिगंबर दराडे" image="http://"][/author]

पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीची लढत पाहयला मिळाली. कोल्हे यांची प्रत्येक मतदारसंघात पकड असल्याचे मतमोजणीतून समोर आले. त्याला हडपसर मतदारसंघदेखील अपवाद राहिला नाही. अमोल कोल्हे यांच्या मताधिक्यामध्ये हडपसरचा वाटा मोठा राहिला. त्यांना एकूण 1 लाख 56 हजार 697 एवढे मताधिक्य मिळाले. यामध्ये 17 हजार 958 एवढे मताधिक्य हडपसर येथून मिळाले.

हडपसर मतदारसंघात पहिल्या फेरीमध्ये 63 मतांचे कोल्हे यांना लीड मिळाले. एकूण मतदारसंघातून त्यांना 6 हजार 87 मतांचे लीड पहिल्या फेरीमध्ये होते, तर दुसर्‍या फेरीमध्ये कोल्हे हडपसरमध्ये 1697 मतांनी पिछाडीवर होते. तिसर्‍या फेरीमध्ये 559 मतांनी आढळराव पाटील आघाडीवर असल्याचे समोर आले. याचबरोबर चौथ्या फेरीमध्ये 2715 मतांचे लीड आढळराव पाटालांना मिळाला असल्याचे पाहयला मिळाले. पाचव्या फेरीमध्ये 786 मतांचे लीड शिवाजीराव आढळराव पाटलांना मिळाले. सहाव्या फेरीमध्ये कोल्हे यांना 4743 इतकी मते मिळाली, तर 6355 मते आढळराव पाटील यांना मिळाली. याचबरोबर सातव्या फेरीमध्ये 4909 मते कोल्हे यांना मिळाली, तर 6447 मते आढळराव पाटील यांना मिळाली.

आठव्या फेरीमध्ये कोल्हेंना 4381 मते मिळाली, तर आढळराव पाटील यांना 3938 इतकी मते मिळाली असल्याचे पाहयला मिळाले. दहाव्या फेरीमध्ये 5688 मते अमोल कोल्हेंना मिळाली, तर 4409 मते आढळराव यांना मिळाली. सतराव्यानंतर हडपसर मतदारसंघात कोल्हे यांचे लीड वाढत असल्याचे चित्र होते. हडपसर हा शहरी मतदारसंघ असल्याने या ठिकाणी आढळराव यांना मोठ्या मताधिक्याची अपेक्षा होती, मात्र ही अपेक्षा अधुरी राहिली. याचबरोबर हडपसर मतदारसंघात माळी समाजाचे प्राबल्य मोठ्या प्रमाणात असल्याचा फायदा कोल्हेंना झाला. या ठिकाणी विद्यमान आमदार चेतन तुपे हेदेखील आढळराव यांच्याबरोबर होते. याचबरोबर भाजपची ताकददेखील या ठिकाणी मोठी आहे, तरीदेखील कोल्हे यांनी आपली मताची आघाडी राहिल्याचे पाहयला मिळाले. हडपसरमध्ये कोल्हे यांनी पहिल्यापासूनच फिल्डिंग लावली होती. प्रामुख्याने या निवडणुकीत नेते आणि जनता असा विरोधाभास बघायला मिळाला. निवडणुकीत नेते एका बाजूला राहिले, तर जनता दुसर्‍या बाजूला गेली. याचा फायदा कोल्हे यांना होताना दिसला.

शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी विजय मिळवला आहे. मतदारांनी शरद पवार यांच्या विचाराला प्राधान्य दिले आणि अजित पवार यांना नाकारले आहे. खर्‍या अर्थाने हा मतदारांचा विजय असून, महाविकास आघाडीचे यश आहे.
-प्रवीण तुपे, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हडपसर

शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. मतदारांचा कौल आम्ही स्वीकारत असून, पुढेही लोकशाहीवर विश्वास ठेवून सामाजिक, राजकीय वाटचाल सुरूच ठेवू. मतदार हा राजा आहे, त्याचा आदर करून पुढेही विश्वास ठेवून काम करीत राहू.

-चेतन तुपे पाटील, आमदार, हडपसर विधानसभा मतदारसंघ.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news