पुणे; पुढारी वृत्तसेवा : स्वत: राहत असलेल्या आणि मागील थकबाकी नसलेल्या मिळकतधारकांनी केवळ चालू वर्षाचे (2023-24) बिल भरावे. यासोबतच पीटी 3 फॉर्म भरून द्यावा; जेणेकरून बिलांमध्ये दिसणारी थकबाकी दिसणार नाही, असे आवाहन महापालिकेने केले आहे. तसेच, शहरातील 10 लाख मिळकतींची बिले पोस्टाने पाठविण्यात आली असून काही दिवसांत नागरिकांना मिळतील; शिवाय महापालिकेच्या संकेतस्थळावरही बिले उपलब्ध होतील.