

पुणे : शास्त्रीय गायनापासून भावगीतापर्यंत... नाट्यगीतांपासून दिवाळीवर आधारित खास बंदिशीपर्यंत... असा सुरेल नजराणा मंगल स्वरांची सूरमयी मैफल दिवाळी स्वरसंध्या या सांगीतिक कार्यक्रमात रसिकांना अनुभवता येणार आहे.(Latest Pune News)
दै. ‘पुढारी’ माध्यम समूहाच्या वतीने धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजेच आज शनिवारी (दि. 18) हा कार्यक्रम सप्तसुरांनी रंगणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक विश्वकर्मा युनिव्हर्सिटी आहे. ख्यातनाम शास्त्रीय गायक पंडित रघुनंदन पणशीकर आणि गायिका विदुषी
मंजूषा पाटील यांच्या सुरेल गायकीने हा कार्यक्रम सजणार आहे. हा कार्यक्रम कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रात्री नऊ वाजता आयोजित करण्यात आला आहे. रसिकांनी उत्स्फूर्तपणे कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका घेतल्या आहेत. बहारदार गायकीने पुणेकर रसिकांची दिवाळीची रात्र आणखी सूरमयी होणार आहे.
दरवर्षी दिवाळी पहाट कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळतेच. दै. ‘पुढारी’ माध्यम समूहाच्या वतीनेही दरवर्षी विविध दिग्गज अन् नवोदित कलाकारांच्या गायकीने सजलेला दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित केला जातोच. पण, यंदा हा ट्रेंड बदलत दिवाळीनिमित्त दै. ‘पुढारी’ने दिवाळी स्वरसंध्येचे आयोजन केले आहे.
दिवाळी स्वरसंध्या कार्यक्रमाने रसिकांची दिवाळीची रात्रसुद्धा सुरेल बनणार आहे. पंडित रघुनंदन पणशीकर यांची अनुभवसंपन्न गायकी आणि मंजूषा पाटील यांच्या बहारदार गायकीचा मिलाफ कार्यक्रमात पाहायला मिळणार असून, शास्त्रीय गायनाच्या जोडीला अभंग, भजन, भावगीते, नाट्यगीतांची सुरेख मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे. त्यांना सुयोग कुंडलकर (संवादिनी), प्रशांत पांडव (तबला), प्रथमेश तरळकर (पखवाज), अपूर्व द्रविड (साइड ऱ्हीदम) आणि जयकिशन (बासरी) हे कलाकारांना साथसंगत करणार आहेत.
या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक विश्वकर्मा युनिव्हर्सिटी आहेत. कार्यक्रमाचे फायनान्स पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड, तर एज्युकेशन पार्टनर ट्रिनिटी ॲकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आहेत. तर ॲकॅडमिक पार्टनर सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आहेत. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक कोहिनूर ग्रुप, अमर बिल्डर्स, नाईकनवरे बिल्डर्स आणि संजय काकडे ग्रुप आहेत.
अनुभवसंपन्न गायकीसाठी पं. रघुनंदन पणशीकर ओळखले जातात, तर मंजूषा पाटील यांनी आपल्या गायकीने रसिकांच्या मनावर वेगळी छाप उमटवली आहे. दोघांच्याही बहारदार गायकीने हा कार्यक्रम रंगणार आहे. प्रचलित विविध रचना आणि भावगीत, नाट्यगीतांचा सुरेल संगम या कार्यक्रमात त्यांच्या गायकीतून रसिकांना अनुभवता येईल. तर, दिवाळीनिमित्त खास बंदिशही सादर करण्यात येणार आहे. दिवाळीनिमित्त रंगणार असलेला हा कार्यक्रम रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. आज हा कार्यक्रम रंगणार असून, अधिकाधिक रसिकांनी कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
हा कार्यक्रम खूप आगळावेगळा असणार आहे. आम्ही दिवाळीनिमित्त अनेक वर्षांनी रात्री सांगीतिक कार्यक्रम सादर करणार असल्याने त्याचेही एक वेगळेपण कलाकार म्हणून मला वाटते.
ही दिवाळीची स्वरसंध्या आहे, हेही एक वेगळेपण आहे. दै. ‘पुढारी’ने हे निमित्त रसिकांना उपलब्ध करून दिले आहे, याचा आनंद आहे.
विदुषी मंजूषा पाटील, गायिका
दै. ‘पुढारी’ने दिवाळीनिमित्त स्वरसंध्या हा कार्यक्रम आयोजित केल्याचा आनंद आहे. दिवाळीनिमित्त धनत्रयोदशीच्या दिवशी हा कार्यक्रम होणार असल्याचे निमित्त खास आहे. यानिमित्ताने आम्ही कार्यक्रमात शास्त्रीय गायनासोबतच अभंग, नाट्यगीते, भावगीते सादर करणार आहोतच. तर, मी दिवाळीनिमित्ताने खास बंदिशही सादर करणार आहे, हा कार्यक्रम आगळावेगळा असून, रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा.
पंडित रघुनंदन पणशीकर, शास्त्रीय गायक
शनिवारी, 18 ऑक्टोबर 2025
कुठे : यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड
वेळ : रात्री नऊ वाजता
कार्यक्रम वेळेत सुरू होईल, याची रसिकांनी नोंद घ्यावी.
कार्यक्रमाची प्रवेशिका विनामूल्य
या कार्यक्रमासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश असणार आहे. कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका रसिकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत. एका प्रवेशिकेवर एकाच व्यक्तीस प्रवेश असेल आणि प्रथम येणाऱ्या व्यक्तीस प्राधान्य दिले जाईल.
दै. ‘पुढारी’च्या कार्यालयात मिळतील प्रवेशिका
दैनिक ‘पुढारी’च्या कार्यालयातही रसिकांना कार्यक्रमाच्या प्रवेशिका मिळणार आहेत. पर्वती येथील मित्रमंडळ चौकातील (पाटील प्लाझासमोर) ‘पुढारी’ कार्यालयात सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत दै. ‘पुढारी’ कार्यालयात प्रवेशिका मिळतील.
येथेही मिळतील कार्यक्रमाच्या प्रवेशिका
कर्वे रस्त्यावरील देसाई बंधू आंबेवाले येथे सकाळी 10 ते दुपारी 2 या वळेत, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड यांच्या कोथरूड येथील चार शाखांमध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 आणि टिळक रस्त्यावरील ग््रााहकपेठेत सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका मिळतील. सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत प्रवेशिका उपलब्ध असतील. याशिवाय बेडेकर गणपती मंदिराचे सभागृह, कोथरूड येथेही कार्यक्रमाच्या प्रवेशिका मिळतील. येथे सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत प्रवेशिका उपलब्ध असणार आहेत.