

पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या 1 हजार 285 हेक्टरपैकी तब्बल 1 हजार 220 हेक्टरची मोजणी पूर्ण झाली आहे. सात गावांपैकी केवळ पारगाव येथील 64 हेक्टरची मोजणी शिल्लक येत्या दोन दिवसांत ती पूर्ण करण्यात आहे. असून दिवाळीनंतर शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यात वाटाघाटी अंतिम करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. पारगाव मधील काही शेतकऱ्यांनी मोजणीस विरोध केल्याने मोजणी रखडली आहे.(Latest Pune News)
पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी, उदाचीवाडी आणि वनपुरी या सात गावांमध्ये विमानतळ उभारण्यात येणार आहे. यासाठी 1 हजार 285 हेक्टर अर्थात तीन हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आतापर्यंत सुमारे 95 टक्के क्षेत्राची संपादनासाठी संमतीपत्रे जिल्हा प्रशासनाकडे सुपुर्द केली आहेत. त्यात सात गावांतील 3 हजार 220 शेतकऱ्यांनी सुमारे 2 हजार 810 एकर क्षेत्राचा समावेश आहे.
संपादनापूर्वी जमीन मोजणीला 26 सप्टेंबरपासून सुरुवात झाली. गेल्या 20 दिवसांत उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, कुंभारवळण या सहा गावांची मोजणी पूर्ण झाली आहे. तर पारगावमधील 186 हेक्टररपैकी 122 हेक्टरची मोजणी पूर्ण झाल्याची माहिती डुडी यांनी दिली. येत्या दोन दिवसांत उर्वरित मोजणीही पूर्ण होईल अशी माहिती त्यांनी या वेळी दिली.
विमानतळाचा प्रकल्प एमआयडीसीकडून विकसित केल्या जात असून यासाठी 2019 च्या भूसंपादन कायद्यानुसार संपादन करण्यात येत आहे. त्यानुसार 10 टक्के विकसित भूखंड देण्यात येणार आहे. मात्र, शेतकऱ्यांनी हा परताना 22.5 टक्के देण्याची मागणी केली आहे. त्याबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करू असे आश्वासन डुडी यांनी दिले. दिवाळीनंतर याबाबत शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांच्या मागणीबाबत राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
गाव क्षेत्र (हेक्टरमध्ये)
एखतपूर 201
मुंजवडी 100
उदाचीवाडी 59
कुंभारवळण 2 63
खानवडी 298
वनपुरी 183
पारगाव 123
विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या सातपैकी सहा गावांतील जमीन मोजणी पूर्ण झाली आहे. ड्रोन सर्वेक्षणही पूर्ण झाले आहे. उर्वरित मोजणी दोन दिवसांत पूर्ण होईल.
जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी