इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने 'आदर्श शिक्षक' पुरस्काराचे वितरण शनिवारी (दि. 9) करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम नेहरू मेमोरियल हॉल, पुणे जिल्हा परिषद नवीन इमारतीशेजारी दुपारी 1 वाजता होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी ही माहिती दिली. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे, आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत.
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीणच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकार्यांना नियुक्तिपत्रे देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमास पदाधिकारी यांनी समर्थकांसह उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष गारटकर यांनी केले आहे.
हेही वाचा :