पुणे : 66 लाखांची फसवणूक करणार्‍या सायबर चोरट्याला बिहारमधून अटक

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.
पुणे; पुढारी वृत्तसेवा : नामांकित कंपनीचा संचालक बोलत असल्याचे सांगून 66 लाख 41 हजार 522 रुपयांचा गंडा घालणार्‍या एकास सायबर पोलिसांनी बिहार येथून अटक केली. बिशाल कुमार भरत (वय 21, रा. बिहार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या सायबर चोरट्याकडून रेड मी कंपनीचा एक मोबाईल आणि 6 सिम कार्ड हस्तगत करण्यात आले आहेत.
फिर्यादी हे एका कंपनीत अकाउंट विभागात नोकरीला आहेत. सायबर चोरट्याने त्याला इन्फिनिटी डेव्हलपर्स प्रा. लिमिटेड कंपनीचा संचालक बोलत असल्याचे सांगून विविध बँक खात्यांत 66 लाख 41 हजार 522 रुपये पाठवण्यास भाग पडून आर्थिक फसवणूक केली होती. 18 ऑगस्ट रोजी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी या गुन्ह्यात वापरलेले मोबाईल क्रमांक, इमेल आयडी, पेमेंट करण्यासाठी पाठवलेल्या लिंक, विविध बँक खात्याच्या तंत्री तपास केला. सायबर चोरट्यांचा हा बिहारमधील सिवान जिल्ह्यातील इजमाली येथील असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार सायबर पोलिसांचे एक पथक पाठवण्यात आले होते.
बिशाल भरत याला अटक करून न्यायालयात हजर केले असता 11 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक मीनल सुपे पाटील, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद खरात, अंमलदार वैभव माने, अश्विन कुमार, शिरिष गावडे यांच्या पथकाने केली.
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news