

कामशेत(पुणे); पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नाणे मावळ परिसरातील वडिवळे धरण 85 टक्के भरले असून, धरणातून आंद्रा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नाणे मावळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने परिसरातील वडिवळे धरण 85.35 टक्के भरले असून, धरणातून बुधवार (दि. 26) पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. 338 क्युसेक वेगाने पाणी सोडले जात असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नदीकाठच्या ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पाण्याच्या विसर्गामुळे नदीकाठच्या शेतीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. वडिवळे, गोवित्री, कांब्रे, उकसान, नाणे, करंजगाव वाड्यांनाही या धरणातील पाण्याचा फायदा होत असतो. धरणसाठ्यात वाढ झाल्याने नाणे मावळातील अनेक वाड्या-वस्त्यांच्या वर्षभराच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे, अशी माहिती प्रकल्प प्रमुख अभियंता संतोष शिंदे यांनी दिली आहे.
हेही वाचा