Ambegaon Dimbhe Dam Old Village: डिंभे धरणात पाणी घटले; जुन्या आंबेगावच्या गावाच्या खुणा पुन्हा उघडल्या

जैन मंदिर, घरांचे अवशेष आणि वस्तीच्या आठवणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
Ambegaon Dimbhe Dam Old Village
Ambegaon Dimbhe Dam Old VillagePudhari
Published on
Updated on

मंचर: आंबेगाव तालुक्यातील हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभेे) धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने जलाशयाखाली गेलेल्या जुन्या आंबेगावच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत. अनेक वर्षांपासून पाण्याखाली असलेले प्राचीन जैन मंदिर, घरांचे अवशेष, वाड्यांच्या जागा आणि जुन्या वस्तीच्या खुणा आता स्पष्टपणे दिसू लागल्या आहेत. त्यामुळे विस्थापित कुटुंबीय आणि त्यांच्या पुढील पिढ्या मूळ गावचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने येथे भेट देत आहेत.

Ambegaon Dimbhe Dam Old Village
Marathi Film Corporation Election: मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीत तिरंगी लढत; तिसऱ्या आघाडीची एन्ट्री

डिंभे धरणाच्या उभारणीसाठी आंबेगावसह अनेक गावे भूसंपादनात गेली होती. त्यानंतर संबंधित कुटुंबांचे पुनर्वसन विविध ठिकाणी करण्यात आले. काळाच्या ओघात गाव जलाशयाखाली गेले असले, तरी त्या गावशी निगडित आठवणी आजही अनेकांच्या मनात जिवंत आहेत.

Ambegaon Dimbhe Dam Old Village
Pune Abandoned Vehicles: पुण्यात बेवारस वाहनांवर कारवाईचा वेग; 739 वाहनांचा लिलाव, नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन

जलाशयातील पाणी कमी झाल्याने जुने मंदिर आणि घरांचे अवशेष उघडे पडताच अनेक जण आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी येथे येत आहेत. जुन्या घरांची जागा शोधताना, शाळेचा परिसर ओळखताना किंवा मंदिराच्या अवशेषांकडे पाहताना अनेकांच्या डोळ्यांत नकळत अश्रू दाटून येत आहेत.

Ambegaon Dimbhe Dam Old Village
India Rice Export: आंबेमोहोर-इंद्रायणीची परदेशातही मोठी मागणी; तांदूळ निर्यातीत भारताचा दबदबा

काही जण आपल्या मुलांना आणि नातवंडांना मूळ गावची ओळख करून देत आहेत. विकासासाठी दिलेल्या त्यागाची साक्ष देणाऱ्या या खुणा आजही विस्थापितांच्या भावविश्वाचा अविभाज्य भाग असल्याचे चित्र येथे पाहायला मिळत आहे.

Ambegaon Dimbhe Dam Old Village
Pune Crime: लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये दगा, तरुणीने दिली बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी, पुण्यात तरुणाचा वेदनादायी शेवट

धरणासाठी गाव सोडावे लागले आणि अनेक जण विस्थापित झाले. पाणी ओसरल्यानंतर घरांची जागा, मंदिर आणि जुन्या खुणा पाहताना बालपणीच्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्या आहेत, असे चांडोलीतील उद्योजक मोहन थोरात यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news