India Rice Export: आंबेमोहोर-इंद्रायणीची परदेशातही मोठी मागणी; तांदूळ निर्यातीत भारताचा दबदबा

जागतिक तांदूळ निर्यातीपैकी 40 टक्के हिस्सा भारताचा; महाराष्ट्रातील सुगंधी तांदळाला नव्या बाजारपेठांची संधी
Rice
RicePudhari
Published on
Updated on

पुणे: सुगंधी तांदूळ अशी ख्याती असलेल्या आणि पुणेकरांच्या आवडीचा असलेल्या आंबेमोहोर आणि इंद्रायणी परदेशातही तितकाच लोकप्रिय असल्याचे तांदळाच्या मागणीवरून स्पष्ट झाले आहे. बासमतीसह आंबेमोहोर, इंद्रायणी आदी बिगर बासमती असलेल्या तांदळाने निर्यातीमध्ये जागतिक बाजारपेठेत निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. भारत आज जगातील सर्वांत मोठा तांदूळ निर्यातदार देश असून, जगातील एकूण तांदूळ निर्यातीपैकी सुमारे 40 टक्के हिस्सा भारताचा आहे. 2024-25 मध्ये देशातून 20 ते 22 दशलक्ष टन तांदूळ निर्यात करण्यात आला असून, त्यातून 12.47 अब्ज डॉलरचे परकीय चलन मिळाले आहे.

Rice
Pune Crime: लिव्ह-इन रिलेशनशिपमधील तरुणाची आत्महत्या; धमकावून पैशांची मागणी करणारे चौघे अटकेत

केंद्र सरकारने काही निर्यात निर्बंध हटवल्यानंतर भारतीय तांदळाची स्पर्धात्मकता वाढली आणि जागतिक बाजारात भारताने पुन्हा मोठी झेप घेतली. 2025 मध्ये भारताची तांदूळ निर्यात 21.55 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचल्याचे उद्योग क्षेत्रातील अंदाज आहेत. भारतातून बासमती आणि बिगर बासमती या दोन्ही प्रकारच्या तांदळाची निर्यात होते.

Rice
Pimpri SRA Scam: झोपडपट्टीच नसताना एसआरए योजना मंजूर? पिंपरीतील सरकारी जागेवरील कथित घोटाळा उघड

प्रमाणाच्या दृष्टीने बिगर बासमती तांदूळ सर्वाधिक निर्यात केला जातो. आफिका, बांगलादेश, नेपाळ, जिबूती, बेनिन आणि कॅमेरून या देशांमध्ये त्याची मोठी मागणी आहे. तर, बासमती तांदूळ हा भारताचा प्रीमियम निर्यात बँड बनला आहे. सौदी अरेबिया, इराण, इराक, यूएई, बिटन आणि अमेरिकेमध्ये भारतीय बासमतीला मोठी मागणी आहे. लांब दाणे, सुगंध आणि उच्च गुणवत्ता यामुळे भारतीय बासमतीला जागतिक बाजारात अधिक दर मिळतो. त्यामुळे प्रमाणाने कमी निर्यात असूनही मूल्याच्या दृष्टीने बासमती तांदूळ अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

Rice
Pune Feeder Pillar Relocation: पुण्यात फीडर पिलर हटवण्यावरून महापालिका-महावितरण आमनेसामने

देशातून होणारी तांदळाची निर्यात

  • वार्षिक निर्यात 20 ते 22 दशलक्ष टन

  • निर्यात कमाई 12.47 अब्ज डॉलर

  • जागतिक हिस्सा सुमारे 40 टक्के

  • जगातील क्रमांक प्रथम

  • प्रमुख प्रकार बासमती आणि बिगर बासमतीhttps://youtu.be/u4s66Qsbqek?si=YBnqyp_0kAYg9HTJ

Rice
Pune PMAY Flats Illegal Rental: पुण्यात PMAY सदनिकांचा गैरवापर; 100–150 फ्लॅट्स बेकायदेशीर भाड्याने

भारतीय तांदूळ सध्या जागतिक बाजारात सर्वाधिक स्पर्धात्मक आहे. बासमतीला मध्य पूर्वेत, तर बिगर बासमतीला आफिकेत मोठी मागणी आहे. भारताचे वर्चस्व आगामी काळातही कायम राहू शकते. महाराष्ट्रातील इंद्रायणी, कोलम आणि आंबेमोहोर या जातींना विशेष बाजारपेठ मिळू शकते. दर्जेदार पॅकिंग आणि निर्यात साखळी मजबूत झाल्यास राज्यातील शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल.

राजेंद्र बाठिया, अध्यक्ष, दि पूना मर्चंट्‌‍स

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news