Marathi Film Corporation Election: मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीत तिरंगी लढत; तिसऱ्या आघाडीची एन्ट्री

पुण्यातील निवडणुकीला वेग; समर्थ, चित्रकर्मी आणि तिसरी आघाडी आमनेसामने
Vote
VotePudhari
Published on
Updated on

पुणे: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. विविध शहरांमध्ये सभा, सदस्यांशी संवाद आणि भेटीगाठींद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. महामंडळाची निवडणूक कोण जिंकणार? याबद्दल उत्सुकता वाढली आहे. आता महामंडळाच्या निवडणुकीत तिसऱ्या आघाडीची ‌‘एन्ट्री‌’ झाली आहे. त्यामुळे आता समर्थ पॅनेल, चित्रकर्मी पॅनेल आणि महामंडळ बचाव अपक्ष संघ यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

Vote
Pune Abandoned Vehicles: पुण्यात बेवारस वाहनांवर कारवाईचा वेग; 739 वाहनांचा लिलाव, नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन

चित्रपट महामंडळ निवडणुकीच्या मतदानाला अवघे पाच दिवस शिल्लक असताना निवडणुकीने वेगळेच वळण घेतले आहे. चित्रपट महामंडळ बचाव अपक्ष संघ या तिसऱ्या आघाडीने आपले आठ उमेदवार मुंबई येथे जाहीर करीत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. अमोल भावे (दिग्दर्शक विभाग), संतोष शिंदे (अभिनेता विभाग), अवधूत जोशी (दिग्दर्शक विभाग), मनोज मराठे (निर्मिती व्यवस्था विभाग), शरद लोणकर (प्रसिद्धी विभाग), महादेव शिरोळकर (निर्माता विभाग), मानसिंग कदम (निर्माता विभाग) आणि उल्हास नांद्रे (कला दिग्दर्शक विभाग) हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. आत्तापर्यंत समर्थ पॅनेल आणि चित्रकर्मी पॅनेल यांच्यात थेट लढत होणार असल्याचे बोलले जात होते.

Vote
India Rice Export: आंबेमोहोर-इंद्रायणीची परदेशातही मोठी मागणी; तांदूळ निर्यातीत भारताचा दबदबा

मात्र, तिसऱ्या आघाडीने दोन्ही पॅनेलला आव्हान दिल्याने निवडणुकीतील चुरस चांगलीच वाढली आहे. निवडणुकीत समर्थ आणि चित्रकर्मी पॅनेलकडून विविध शहरांमध्ये सभा, सदस्यांशी संवाद आणि भेटीगाठींद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. मंगळवारी ( दि. 2) चित्रकर्मी पॅनेलची प्रचार सभा झाली.

Vote
Pune Crime: लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये दगा, तरुणीने दिली बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी, पुण्यात तरुणाचा वेदनादायी शेवट

सभेत अभिनेते विजय पाटकर, ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर, पॅनेलप्रमुख आनंद काळे आणि अन्य उमेदवार उपस्थित होते. सुमारे 30 हजार आजीव सभासदांना अद्याप ‌‘अ‌’ वर्गाचा दर्जा मिळालेला नसल्याने त्यांना मतदानाचा हक्क मिळालेला नाही. या सभासदांना न्याय मिळवून देणे, आणि महामंडळाचे कामकाज अधिक पारदर्शक करणार असल्याचे आनंद काळे यांनी सभेत सांगितले. चित्रपटसृष्टीतील विविध प्रश्न आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, आमचे पॅनेल निवडणूक जिंकल्यास त्यासाठी काम करणार आहे, असे वर्षा उसगावकर यांनी सांगितले.

Vote
Pimpri SRA Scam: झोपडपट्टीच नसताना एसआरए योजना मंजूर? पिंपरीतील सरकारी जागेवरील कथित घोटाळा उघड

रविवारी होणार निवडणूक

महामंडळाच्या 17 जागांपैकी अभिनेत्री गटातून वर्षा उसगावकर, संकलन गटातून विजय खोचीकर आणि संगीत गटातून आनंद शिंदे हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे उर्वरित 14 जागांसाठी रविवारी (दि. 7) मतदान होणार आहे. यात सुमारे 3,403 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पुण्यासाठी स. प. महाविद्यालय हे मतदान केंद्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news