Dimbe Canal Water: डिंभे उजव्या कालव्याचे पाणी शेतात शिरले; काढणीला आलेल्या कोथिंबिरीचे नुकसान होण्याची भीती

काठापूर बुद्रुकमधील गणेशवस्ती येथील शेतात पाणी साचले; पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी
Coriander Crop Damage
Coriander Crop DamagePudhari
Published on: 
Updated on: 

मंचर: काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील गणेशवस्ती परिसरात डिंभे उजवा कालव्याचे पाणी शेतात शिरले आहे. यामुळे येथील कोथिंबीर पिकाला धोका निर्माण झाला आहे. काढणीसाठी तयार असलेल्या पिकात पाणी साचल्याने मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Coriander Crop Damage
Kurkumbh Pharma Incident: कुरकुंभच्या त्रिमूर्ती फार्मा कंपनीतील घटनेची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सलग दोन दिवस पाहणी

सध्या हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणाच्या उजवा कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडले आहे. परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची गरज असल्याने कालव्याच्या पाण्याला मागणी आहे. मात्र, रात्रीच्या वेळी कालव्यातून सोडलेले पाणी खोलगट भागातून वाहत अंकुश जाधव यांच्या शेतात पोहचले. त्यामुळे कोथिंबीर पिकात पाणी साचले आहे. त्यामुळे काढणीच्या टप्प्यावर असलेल्या या पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Coriander Crop Damage
Bibwewadi Illegal Banners: आयुक्तांचे आदेश कागदावरच? बिबवेवाडीत अनधिकृत बॅनर-फ्लेक्सचा सुळसुळाट; कारवाईकडे दुर्लक्ष

कालव्यातून रात्रीच्या वेळी पाणी कोणी सोडले, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. या प्रकारामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. संबंधित शेतकऱ्याने याबाबत तक्रार करून भरपाई देण्याची मागणी केली आहे.

Coriander Crop Damage
Keshavnagar Encroachment: महापालिकेची कारवाई संपताच केशवनगरमध्ये अतिक्रमणे पुन्हा 'जैसे थे'; २४ मीटर रस्ता मोकळा करण्याची मागणी

कालव्याच्या पाण्याचे वितरण करताना जलसंपदा विभागाने योग्य नियोजन करावे. एका शेतकऱ्याला पाणी मिळताना दुसऱ्या शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान होणार नाही, यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

Coriander Crop Damage
Pune Children Assemblies: पुण्यात ७०० विद्यार्थ्यांची बालसभा; पदपथ, वाहतूक, प्रदूषण अन् पाण्याच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना जाब

शेतीसाठी कालव्यातून रात्री पाणी सोडण्यात आले; मात्र हे पाणी माझ्या शेतात शिरल्याने काढणीला आलेल्या कोथिंबीर पिकात साचले.संबंधित विभागाने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी.

अंकुश जाधव, कोथिंबीर उत्पादक शेतकरी, काठापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.