Dhayari Nanded Traffic: धायरी-नांदेड परिसरात वाहतूक कोंडीचे ग्रहण; ५ किलोमीटरसाठी तासभराचा प्रवास

नांदेड फाटा ते धायरी फाट्यादरम्यान वाहनांचा ताण; कालव्यालगतचा पर्यायी मार्ग सुरू करण्याची नागरिकांची मागणी
Pune Traffic Congestion
Pune Traffic CongestionPudhari
Published on: 
Updated on: 

खडकवासला: धायरी, नांदेड आगड रस्ता परिसरातील वाढती लोकसंख्या, तसेच झपाट्याने वाढणाऱ्या गृहप्रकल्पांमुळे वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नांदेड फाटा, दळवीवाडी चौक, लगडमाळा, धायरी फाटा तसेच अंतर्गत रस्त्यांवर सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी, व्यावसायिक आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

Pune Traffic Congestion
Subhash Katkar Transfer: पुणे विभागीय कृषी सहसंचालकपदी सुभाष काटकर; जेजुरकरांचा अतिरिक्त पदभार संपला

सिंहगड रस्ता परिसरातून पुणे शहराच्या विविध भागांत जाण्यासाठी असलेल्या प्रमुख रस्त्यांवर सध्या वाहतुकीचा मोठा ताण येत आहे. या भागात गेल्या काही वर्षांत मोठमोठे निवासी प्रकल्प उभे राहिले असून, नवीन गृहप्रकल्पांची भर सातत्याने पडत आहे. परिणामी वाहनांची संख्या वाढली आहे. मात्र, त्या तुलनेत रस्त्यांची क्षमता आणि पर्यायी मार्गांची उपलब्धता वाढलेली नाही. या रस्त्याला वाहतूक कोंडीचे ग्रहण लागल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

Pune Traffic Congestion
Maharashtra Sports Policy: क्रीडा आरक्षणाचा ‘तीन ऑलिम्पिक’ निकष खेळाडूंच्या मुळावर; महाराष्ट्राच्या नव्या क्रीडा धोरणावर संताप

विशेषतः नांदेड फाटा ते धायरी फाटा या अवघ्या पाच किलोमीटर अंतरासाठी गर्दीच्या वेळेत नागरिकांना तब्बल तासभर वेळ लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे दळवीवाडी चौक, लगड मळा आणि धायरी फाटा परिसरातील वाहतूक वारंवार संथ होते. वाहतूक कोंडीमुळे इंधनाचा खर्च वाढत असून, वेळेचाही अपव्यय होत असल्याने नागरिकांनी सांगितले.

Pune Traffic Congestion
Pune Navratri Dandiya Garba Events: पुण्यात नवरात्रोत्सवाचा दांडिया-गरबा जल्लोष; १०० हून अधिक कार्यक्रमांची धूम

कालव्यालगतचा मार्ग सुरू करावा

मुठा कालव्यालगत नांदेड फाटा ते धायरी फाट्यादरम्यान असलेला पर्यायी मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिल्यास सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीचा ताण काही प्रमाणात कमी होऊ शकतो. त्यामुळे या मार्गाची पाहणी करून आवश्यक कामे पूर्ण करावीत आणि तो वाहतुकीसाठी सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Pune Traffic Congestion
Kasba Ganpati Temple Theft: कसबा गणपती मंदिरात दानपेट्या फोडल्या; ५० ते ६० हजारांची रोकड लंपास, चोरटा अटकेत

मेट्रोच्या कामापूर्वी उपाययोजनांची गरज

दरम्यान, भविष्यात या परिसरात मेट्रोचे काम सुरू झाल्यानंतर वाहतुकीची समस्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. मेट्रोच्या कामामुळे रस्त्यावरील उपलब्ध जागा कमी झाल्यास वाहतूक कोंडी आणची वाढू शकते. त्यामुळे मेट्रोचे काम सुरू होण्यापूर्वीच पर्यायी मार्ग विकसित करणे, रस्त्यांचे रुंदीकरण करणे आणि वाहतूक व्यवस्थापनाचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news