Pune Navratri Dandiya Garba Events: पुण्यात नवरात्रोत्सवाचा दांडिया-गरबा जल्लोष; १०० हून अधिक कार्यक्रमांची धूम

बॉलीवूड गरबा नाईटपासून डिस्को दांडियापर्यंत विविध कार्यक्रम; सेलिब्रिटी, डीजे, लाइव्ह ऑर्केस्ट्रासह आयटीयन्सही थिरकणार
Garba
GarbaPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पुण्यात दांडिया-गरब्याच्या जल्लोषाची तयारी सुरू झाली आहे. 'बॉलीवूड गरबा नाईट', 'डिस्को दांडिया', 'दांडिया धूमधडाका', 'डीजे गरबा नाईट' अशा विविध संकल्पनांवर आधारित कार्यक्रम शहर आणि उपनगरांमध्ये रंगणार आहेत. बावधनपासून हडपसरपर्यंत आणि हिंजवडीपासून खराडीपर्यंत शहर आणि उपनगरांमध्ये अंदाजे १०० हून अधिक कार्यक्रम होणार आहेत. सेलिब्रिटींची उपस्थिती, डीजे, लाइव्ह ऑर्केस्ट्रा आणि आकर्षक रोषणाई यामुळे नवरात्रोत्सवातील या कार्यक्रमांना विशेष रंगत येणार आहे.

Garba
Kasba Ganpati Temple Theft: कसबा गणपती मंदिरात दानपेट्या फोडल्या; ५० ते ६० हजारांची रोकड लंपास, चोरटा अटकेत

या कार्यक्रमांचे नियोजन पुण्यातील इव्हेंट कंपन्या करीत आहेत, सजावटीपासून ते सेलिब्रिटी गेस्टसाठीचे नियोजन अनेक इव्हेंट कंपन्यांकडून करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाला रविवारपासून (दि.११) सुरुवात होत असून, पहिल्या दिवसापासूनच अनेक ठिकाणी कार्यक्रम सुरू होणार आहेत. काही आयोजकांनी सलग नऊ दिवस कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, तर काही ठिकाणी दोन दिवसांचा दांडिया-गरबा महोत्सव आयोजित केला आहे. दांडिया-गरबा महोत्सव आणि स्पर्धेचेही आयोजन केले आहे. गुजराती पारंपरिक गीतांसह हिंदी आणि मराठी गीतांवरही तरुणाई थिरकणार आहे.

Garba
Pune Sewage Treatment Project: पुण्याच्या सांडपाणी व्यवस्थेला मिळणार बूस्टर; १,४३८ कोटींचा प्रस्ताव, १०० टक्के सांडपाणी प्रक्रियेचे लक्ष्य

पारंपरिक वेशभूषेत तरुणाई कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार

साल्सा गरबा, वेस्टर्न गरबा, फायर गरबा आणि बॉलीवूड गरबा अशा वेगवेगळ्या प्रकारांचा कार्यक्रमांमध्ये समावेश आहे. काही ठिकाणी डीजेच्या तालावर, तर काही ठिकाणी लाइव्ह ऑर्केस्ट्राच्या साथीने दांडिया कार्यक्रम रंगणार आहे. इव्हेंट कंपन्यांकडून रंगमंच, आकर्षक प्रकाशयोजना, रंगीबिरंगी सजावट आणि अत्याधुनिक ध्वनिव्यवस्थेची तयारी सुरू आहे. सहभागींसाठी काही ठिकाणी ड्रेसकोड ठेवण्यात आला असून, गुजराती, राजस्थानी तसेच मराठमोळ्या पारंपरिक वेशभूषेत तरुणाई कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे. सेलिब्रिटींसह गायक, डीजे, वादक, नृत्यदिग्दर्शक आणि नृत्यकलाकारांच्या सहभागामुळे कार्यक्रमांना मनोरंजनाची जोड मिळणार आहे. इव्हेंट कंपन्यांचे कार्यक्रमांचे नियोजन अंतिम टप्प्यात आले असून, शहर आणि उपनगरांतील लॉन्स, क्लब हाऊस, सभागृह, मैदान आदी ठिकाणी हे कार्यक्रम आयोजित केले आहेत.

Garba
AI Quantum Technology Insurance: AI आणि क्वांटम तंत्रज्ञानामुळे विमा क्षेत्रात मोठे बदल; राष्ट्रीय विमा अकादमीच्या शिखर संमेलनात सायबर सुरक्षेवर भर

कार्यक्रमांमुळे रोजगाराच्या संधी मिळतात

इव्हेंट अँड एंटरटेन्मेंट मॅनेजमेंट असोसिएशनचे (इमा) सदस्य निखिल कटारिया म्हणाले, पुण्यातही दांडिया-गरबाचे कार्यक्रम मोठ्या संख्येने आयोजित केले जात आहेत. नवरात्रोत्सवाच्या साधारण तीन महिने आधीपासूनच इव्हेंट कंपन्यांनी कार्यक्रमांचे नियोजन सुरू केले आहे. जागानिश्चिती, परवानग्या, कलाकारांची निवड, तिकीटविक्री, प्रायोजक, ध्वनिव्यवस्था आणि सजावट याबरोबरच गर्दीचे नियोजन, पार्किंग आणि सुरक्षेची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या कार्यक्रमांमुळे डीजे, गायक, वादक, नृत्यकलाकार, ध्वनितंत्रज्ञ, लाइटमन, सजावटकार आणि सुरक्षारक्षकांना रोजगाराच्या संधी मिळतात.

Garba
Pune Rabi Sowing: पुणे जिल्ह्यात रब्बी पेरण्यांवर दुष्काळाचे सावट; परतीच्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

आयटीयन्सही सज्ज.....

शिक्षण आणि नोकरीसाठी देशाच्या विविध भागांतून पुण्यात आलेले तरुण-तरुणीही नवरात्रोत्सवातील दांडिया-गरबा कार्यक्रमांमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. यंदाही हिंजवडी, खराडी, विमाननगर, बाणेर, औंध अशा विविध भागांतील आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे तरुण-तरुणी मोठ्या संख्येने दांडिया-गरबा कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार असून, पारंपरिक पेहरावात नृत्य करतानाचे छायाचित्र, सेल्फी आणि रील्स सोशल मीडियावर शेअर करण्यात येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news