शरद पवारांनी भरीव निधी दिल्यामुळेच शहराचा विकास : आमदार रोहित पवार

शरद पवारांनी भरीव निधी दिल्यामुळेच शहराचा विकास : आमदार रोहित पवार

पिंपरी : शरद पवार यांच्या दूरदृष्टी धोरणामुळे आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याने पिंपरी-चिंचवड शहराचा चेहरामोहरा बदलला. आता शहरात दिसत असलेली कामे त्या निधीतून झाली आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार रोहित पवार यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सागर चिंचवडे यांच्या चिंचवड येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आ. रोहित पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, प्रदेश प्रवक्ते रवीकांत वरपे, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, इंडिया आघाडी समन्वयक मानव कांबळे, माधवी जोशी, डॉ. सतीश कांबळे, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, युवक प्रदेश सरचिटणीस प्रशांत सपकाळ, विशाल जाधव, जनाबाई जाधव, महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर, संगीता जाधव, संतोष माळी, अनिल भोसले, विवेक विधाते, अशोक तनपुरे, राहुल धनवे व पदाधिकारी उपस्थित होते.
3 हजार 500 कोटींची निधी शहरासाठी उपलब्ध करून दिला.

संबंधित बातम्या :

आ. पवार म्हणाले, की, पिंपरी-चिंचवड शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी निर्णायक भूमिका जर कोणी बजावली असेल, तर ती भूमिका बजावणारे शरद पवार हेच आहेत. मागील काळात त्यांनी केंद्रीय मंत्री असताना जेएनएनयूआरएम अंतर्गत तब्बल 3 हजार 500 कोटींची निधी शहरासाठी उपलब्ध करून दिला. या भरीव निधीमुळेच पिंपरी-चिंचवड शहरात आज अस्तित्वात असलेले उड्डाण पूल, प्रमुख रस्ते, उद्याने, दवाखाने, नाट्यगृहे, अग्निशमन केंद्र, सायन्स पार्क, ऑटो क्लस्टर दिसत आहेत. मात्र, सन 2014 नंतर म्हणावी तशी प्रगती या शहराची झाली नाही, अशी टीका त्यांनी केली.कार्यक्रमात आशिष पांढरे, अमित तलाठी, नागेश सदावर्ते, मयूर आरसुळ यांना विविध पदांवर नियुक्ती देण्यात आली. यानिमित्ताने आधार कार्ड दुरुस्ती अभियान राबविण्यात आले. त्यात 756 नागरिकांनी सहभाग घेतला. तर, रक्तदान शिबिरात 581 जणांनी रक्तदान केले. अ‍ॅड. निकिता चिंचवडे यांनी आभार मानले.

logo
Pudhari News
pudhari.news