म्हापसा ; पुढारी वृत्तसेवा इस्राईल-हमास युद्धच्या पार्श्वभूमीवर म्हापसा येथे काही इस्राईलच्या समर्थकांनी बेकायदेशीररित्या काढलेली रॅली म्हापसा पोलिसांनी उधळून लावली.
युद्धतील मृतांना श्रद्धाजली म्हणून या एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. म्हापसा बाजारपेठेच्या प्रवेशद्वारावर देशविदेशातील सुमारे 20 ते 25 जणांनी (गोमंतकीय नव्हे) निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडे कोणतीही परवानगी नसल्याने पोलिसांनी त्यांच्याकडील सामान जप्त केले व त्यांना हुसकावून लावले. त्यानंतर ते सर्वजण बाजारपेठेतील एका कॅफेमध्ये गेल्यामुळे या कॅफेला म्हापसा, कोलवाळ व हणजूण पोलिसांनी एक प्रकारे वेढा घातला. बऱ्याच वेळानंतर त्यातील काही जण हळू हळू तेथून पसार झाले.
हेही वाचा :