जुन्नर : तुळजाभवानीच्या पलंगाचे तुळजापूरला प्रस्थान

जुन्नर : तुळजाभवानीच्या पलंगाचे तुळजापूरला प्रस्थान
Published on
Updated on

जुन्नर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : श्रीतुळजाभवानी माता पलंगाचे जुन्नर येथील 10 दिवसांच्या वास्तव्यानंतर शनिवारी (दि. 30) जुन्नरहून नगरमार्गे तुळजापूरकडे वाजतगाजत मिरवणूक काढून पारंपरिक पद्धतीने भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. घोडेगाव येथे हा भवानीमाता पलंग तयार होऊन त्याचे भाद्रपद षष्ठीला जुन्नर येथे आगमन होते.

तिळवण तेली समाज सभागृहात या पलंगाचे 10 दिवस वास्तव्य असते. यादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन समाज बांधवांकडून करण्यात येते. शनिवारी सकाळी पलंगाची मिरवणूक कल्याण पेठ, रविवार पेठ, तेली बुधवार, मंगळवार पेठ, पणसुंबा पेठ, सुसरबाग मार्गे काढण्यात येऊन कुमशेत गावाकडे पलंगाचे प्रस्थान झाले. पलंगाच्या आगमनावेळी या पेठेतील नागरिकांनी घरासमोर रांगोळ्या काढून भंडारा-खोबर्‍याची उधळण करीत पलंगाचे स्वागत केले.

ऋषीपंचमी ते दसरा या कालावधीत हा पलंग जुन्नर, नगर ते तुळजापूरपर्यंत पायी प्रवास करीत मार्गक्रमण करतो. हा पलंग नेण्याचा मान नगरच्या पलंगे घराण्याकडे आहे. तुळजापूर मंदिरातील गाभार्‍यात दसरा ते कोजागिरी पौर्णिमा या पाच दिवसांत तुळजाभवानीदेवीची श्रमनिद्रा हा धार्मिक विधी पार पडतो.

घोडेगाव येथून पलंगाचे आगमन जुन्नर येथे झाल्यानंतर शहरातून पलंगाची मिरवणूक काढण्यात येते. त्यानंतर धार्मिक परंपरानुसार श्रीतुळजाभवानी देवीची पलंगावर विधिवत स्थापना केली जाते. या पलंगाचा मुक्काम 10 दिवस फक्त जुन्नरमध्येच तिळवण तेली समाज सभागृहात असतो. या 10 दिवसांचे सर्व नियोजन जुन्नर येथील तिळवण तेली समाज बांधवांच्या वतीने करण्यात येते.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news