Pimpri News : डेंग्यूची साथ तूर्तास आटोक्यात; डिसेंबरमध्ये एकही रुग्ण नाही

Pimpri News : डेंग्यूची साथ तूर्तास आटोक्यात; डिसेंबरमध्ये एकही रुग्ण नाही

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरामध्ये डिसेंबर महिन्यात गेल्या 12 दिवसांमध्ये डेंग्यूचा एकही बाधित रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे डेंग्यूची साथ तूर्तास आटोक्यात आली असल्याचे  चित्र आहे. शहरामध्ये जुलै महिन्यात 36 बाधित रुग्ण आढळले होते. त्यानंतर ऑगस्टमध्ये 52, सप्टेंबर – 60, ऑक्टोंबर – 81 रुग्ण आढळुन आले. नोव्हेंबर महिन्यात रुग्णसंख्या घटली. केवळ 24 बाधित रुग्ण आढळले. तर, डिसेंबरमध्ये गेल्या 12 दिवसांत एकही बाधित रुग्ण आढळलेला नाही.

हिवतापाचेही शून्य रुग्ण

शहरामध्ये डिसेंबर महिन्यात गेल्या 12 दिवसांत हिवतापाचा (मलेरिया) देखील बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. शहरात जुलै महिन्यात हिवतापाचा एकही बाधित रुग्ण नव्हता. तर, ऑगस्ट – 6, सप्टेंबर आणि ऑक्टोंबर प्रत्येकी 1, नोव्हेंबर – 2 असे बाधित रुग्ण आढळले आहेत. चिकुनगुणियाचा मात्र जुलै महिन्यापासून एकही बाधित रुग्ण आढळलेला नाही.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news