Daund Nagar Parishad Election: आजी-माजी आमदारांचे भवितव्य पणाला!

दौंड नगरपालिकेसाठी मतदान शांततेत पार; निकालाकडे मतदारांचे लक्ष
Daund Elections
Daund ElectionsPudhari
Published on
Updated on

उमेश कुलकर्णी

दौंड : नगरपालिकेची निवडणूक मंगळवारी (दि. 2) शांततेत पार पडली. संपूर्ण प्रचारकाळात आरोप-प्रत्यारोपांची मालिका झडत राहिली. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या वतीने दुर्गादेवी जगदाळे, भाजपा पुरस्कृत नागरिक हित संरक्षण मंडळाकडून मोनाली वीर, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या वतीने कोमल बंड हे प्रमुख उमेदवार होते. सर्व उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद झाले असून, निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. ही निवडणूक स्थानिक असली तरी यामध्ये आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Daund Elections
Alandi Nagar Parishad Election: आळंदीत भाजप-राष्ट्रवादीत कडवी झुंज

या निवडणुकीवर आमदार राहुल कुल, नागरिक हित सरंक्षण मंडळाचे प्रेमसुख कटारिया, माजी आमदार रमेश थोरात व दौंड शुगरचे ज्येष्ठ संचालक वीरधवल जगदाळे यांच्या राजकीय प्रभावाची छाप दिसून आली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांनी 25 जागांवर उमेदवार दिले. नागरिक हित संरक्षण मंडळाने सर्व जागांवर उमेदवारी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष फक्त 18 जागांवर उमेदवार उभे करू शकले. शिवसेना (उबाठा) पक्षाकडून एका जागेवर उमेदवारी देण्यात आली, तर आम आदमी पक्षाने येथे नगरसेवक पदासाठी 7 जणांना उमेदवारी दिली होती.

Daund Elections
Jejuri Nagar Parishad Election: राज्यात महायुती, जेजुरीत एकमेकांविरोधात लढाई; नगरपरिषद निवडणुकीत 'धनलक्ष्मी'चा मुक्त वापर!

दौंड नगरपालिकेत 50 हजार 490 मतदार असून, यांपैकी 29 हजर 951 मतदारांनी मतदान केले. मतदानाचा टक्का 59.32 नोंदवला गेला. मागील पंचवार्षिक तुलनेत यंदाचे मतदान कमी झाल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. प्रचारदरम्यान एका भागात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)चे कार्यकर्ते आणि आमदार राहुल कुल यांच्या समर्थकांमध्ये किरकोळ चकमक झाली होती. वेळीच वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

Daund Elections
Bird Alopecia Research: माणसांप्रमाणे पक्ष्यांनाही टक्कल; पुणे-पिंपरीतील तिघा पक्ष्यांची राष्ट्रीय स्तरावर पहिली नोंद!

या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप झाल्याच्या चर्चा शहरात जोरदार सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व नागरिक हित संरक्षण मंडळ या दोन्ही गटांकडून पैशांचे वाटप झाल्याची चर्चा शहरात आहे. काही प्रभागांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडूनदेखील अल्प प्रमाणात पैसे वाटप केल्याच्या चर्चा आहेत. एवढे खुलेआम वाटप झाल्याचे बोलले जात असूनही एकाही गटाने औपचारिक तक्रार दाखल केलेली नाही.

Daund Elections
Leopard Captured Pune: शिरूरमध्ये बिबट्यांचा हाहाकार! एकाच दिवशी 3 थरार; 3 जेरबंद, विहिरीतील बिबट्याला जीवदान.

दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार एका प्रभागाची निवडणूक 20 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे अंतिम निकालासाठी नागरिकांना आणि उमेदवारांना काही दिवस अधिक प्रतीक्षा करावी लागणार आहे. परंतु एकूणच या निवडणुकीत आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

लहान पक्षांचा प्रभाव कमी

राष्ट्रीय पक्ष असलेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इतर लहान पक्षांनी निवडणूक लढवली असली तरी प्रमुख गटांच्या प्रचंड आर्थिक जोरासमोर ते हतबल दिसले. एवढ्या उघडपणे पैशांचे वाटप होत असूनही एकाही पक्षाने तक्रार नोंदवली नाही, ही बाब सर्वांना खटकणारी ठरली.

Daund Elections
Ujani Rosy Starling: बायोअंशी तत्त्व! उजनीच्या आकाशात हजारो भोरड्यांची चित्तथरारक ‘मुर्मुरेशन’ हवाई कसरत

पोलिस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस यांनी निवडणुकीपूर्वी काही जणांना तडीपार केले जाईल, असे संकेत दिले होते. मात्र, प्रमुख कारवाया झाल्याचे विशेष दिसले नाही. त्यामुळेच ‌‘पोलिस यंत्रणा राजकीय दबावाखाली काम करते का?‌’ असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आगामी काळात दोन गटांमध्ये हाणामाऱ्या होण्याची शक्यता असल्याने पोलिस प्रशासनाने सतर्क राहण्याची मागणीदेखील नागरिकांनी केली आहे.

Daund Elections
Dashabhuja Datta Temple: १२व्या शतकातील लोणी भापकर! देशातील ‘या’ एकमेव दत्तमूर्तीचा इतिहास आणि आजचा सोहळा

प्रमुख राजकीय समीकरण

मुख्य लढत : राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) विरुद्ध नागरिक हित संरक्षण मंडळ-भाजपा युती

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाची ताकद मर्यादित.

निकालाचे केंद्रबिंदू : कुल-जगदाळे-थोरात-कटारिया गटांची मते.

एक प्रभागाची निवडणूक : न्यायालयाच्या आदेशाने

20 डिसेंबर रोजी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news