Illegal Liquor Trade: दौंडमध्ये अवैध दारू व्यवसाय तेजीत; भीमा नदीमार्गे होत असल्याचा पुरवठ्याचा आरोप

विषारी दारूकांडानंतरही हातभट्ट्या सुरूच; पोलिसांच्या भूमिकेवर नागरिकांकडून गंभीर प्रश्न
Liquor
LiquorPudhari
Published on
Updated on

दौंड: पुणे जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या विषारी दारूच्या दुर्घटनेनंतरही दौंड परिसरात अवैध दारूचा व्यवसाय थांबण्याऐवजी अधिक तेजीत सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दौंड शहर आणि ग््राामीण भागात गावठी दारूच्या हातभट्‌‍ट्या राजरोसपणे धगधगत असून, एखादी मोठी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Liquor
Purandar Illegal Liquor Network: विषारी दारूकांडानंतर पुरंदरातील हातभट्टी व्यवसाय पुन्हा चर्चेत; अवैध जाळ्याच्या सखोल तपासाची मागणी

शहरातील गोवा गल्ली, गिरीम परिसर आणि दौंडच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर हातभट्टी दारू तयार केली जाते. विशेष म्हणजे, भीमा नदीपलीकडून ट्यूबच्या साहाय्याने दररोज पहाटे मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक शहरात केली जाते. हे सर्व प्रकार पोलिसांना इत्थंभूत माहित असूनही, वरिष्ठांच्या दबावानंतर केवळ मकागदी घोडेफ नाचवण्यासाठी किरकोळ कारवाया केल्या जातात. अवैध धंदेवाले आणि पोलिसांमधील ‌‘अर्थ‌’पूर्ण संबंधांमुळेच या व्यवसायाला अभय मिळत असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

Liquor
Shirur Chain Snatching Arrest: शिरूरमध्ये सोनसाखळी चोरट्याला अटक; तीन गुन्ह्यांची उकल, चार लाखांचा मुद्देमाल जप्त

जुन्या जखमा आणि राजकीय वरदहस्त

दौंड हे हातभट्टी उत्पादनाचे जुने केंद्र मानले जाते. अनेक कुटुंबे पिढ्यान्‌‍पिढ्या याच व्यवसायात आहेत. काही वर्षांपूर्वी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या भट्‌‍ट्यांवर कारवाईचा प्रयत्न केला असता, त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. तत्कालीन गृहमंत्री बबनराव पाचपुते यांनी तेव्हा कठोर पावले उचलली होती; परंतु काही दिवसांनी परिस्थिती पुन्हा मजैसे थेफ झाली.

Liquor
Shikrapur Illegal Liquor Raid: शिक्रापूर-सणसवाडीत पोलिसांचा धडाका; तीन दारूभट्ट्या उद्ध्वस्त, अनेकांवर गुन्हे

भीमा नदीतून ‌‘ट्यूब‌’द्वारे जीवघेणा प्रवास

दौंड शहरात येणाऱ्या अवैध दारूचा मार्ग अत्यंत विदारक आहे. भीमा नदीच्या पात्रातून रबरी ट्यूबच्या साहाय्याने दारूची पोती वाहत आणली जातात. पोलिसांच्या डोळ्यांदेखत दररोज सकाळी हा ‌‘मृत्यूचा साठा‌’ शहरात दाखल होतो; मात्र, हप्तेखोरीमुळे पोलिस याकडे डोळेझाक करत आहेत. पुणे जिल्ह्यासारखाच ‌‘दौंड पॅटर्न‌’ झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार पोलिस प्रशासन असेल, अशी संतप्त भावना व्यक्त होत आहे.

Liquor
Bhimashankar Pilgrimage Facilities: भीमाशंकरमध्ये पर्यावरणपूरक सुविधांची गरज; भाविकांच्या सोयींसाठी नवा मार्ग

मुळासकट उच्चाटन आवश्यक

दौंडमधील ही परिस्थिती पाहता, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. भविष्यातील मोठी दुर्घटना टाळण्यासाठी या अवैध धंद्यांचे मुळासकट उच्चाटन करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

गांधी चौकातील पत्त्याचा क्लब आणि मुजोरी

दारूच्या भट्‌‍ट्यांसोबतच गांधी चौकात सुरू असलेला पत्त्‌‍याचा क्लबही चर्चेचा विषय ठरत आहे. राजकीय पाठबळ लाभलेला हा क्लबचालक इतका मुजोर आहे की, तो कारवाई करण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्धच खोट्या तक्रारी दाखल करतो. मागील आठवड्यात पत्रकारांनी या सर्व अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना देऊनही, यंत्रणेने केवळ थातूरमातूर कारवाईचे नाटक केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news