Purandar Illegal Liquor Network: विषारी दारूकांडानंतर पुरंदरातील हातभट्टी व्यवसाय पुन्हा चर्चेत; अवैध जाळ्याच्या सखोल तपासाची मागणी

सोनोरी, कोडीत, दिवे ते जेजुरी परिसरात अवैध दारू उत्पादनाचे आरोप; पुरवठा साखळी आणि प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित
Illegal Liquor Network
Illegal Liquor NetworkPudhari
Published on
Updated on

सासवड: पुण्यातील हडपसर, ससाणेनगर आणि पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी परिसरात मिथेनॉलमिश्रित विषारी दारूप्राशनामुळे 17 जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यभरात अवैध दारूविरोधी कारवाईची मोहीम सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यात आजही हातभट्टीच्या दारूचे उत्पादन आणि विक्री राजरोसपणे सुरू असल्याचे आरोप होत असून, पोलिस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Illegal Liquor Network
Shirur Chain Snatching Arrest: शिरूरमध्ये सोनसाखळी चोरट्याला अटक; तीन गुन्ह्यांची उकल, चार लाखांचा मुद्देमाल जप्त

ग््राामीण भागात हातभट्टीचे जाळे

सासवड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सोनोरी, कोडीत, दिवे, वनपुरी, चांबळी, आंबोडी, सोमुर्डी तसेच गराडे परिसरात हातभट्टीच्या दारूचे उत्पादन आणि विक्री सुरू असल्याचे आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहेत. काही ठिकाणी खुलेआम विक्री होत असल्याचीही चर्चा आहे. कुंभारवळण परिसरात फिरत्या पद्धतीने दारू विकली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ग््राामीण भागात तयार होणारी ही दारू केवळ गावपातळीवरच मर्यादित राहत नसून, सासवड शहरातील काही भागांत मोठ्या प्रमाणावर पोहोचत असल्याचा दावा केला जात आहे. कोडीत नाका, खंडोबानगर आणि काही वस्तीभागांमध्ये अवैध दारू सहज उपलब्ध होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Illegal Liquor Network
Shikrapur Illegal Liquor Raid: शिक्रापूर-सणसवाडीत पोलिसांचा धडाका; तीन दारूभट्ट्या उद्ध्वस्त, अनेकांवर गुन्हे

जेजुरी परिसरातही हातभट्‌‍ट्यांची चर्चा

जेजुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नाझरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात, नदीकाठच्या दुर्गम भागात तसेच वाघापूर, राजेवाडी आणि आसपासच्या परिसरात हातभट्‌‍ट्या सुरू असल्याचे आरोप सातत्याने समोर येत आहेत. या भागांमध्ये यापूर्वी कारवाया झाल्याच्या घटना घडल्या असल्या, तरी काही दिवसांनी पुन्हा त्याच ठिकाणी उत्पादन सुरू होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. यामुळे कारवायांचा दीर्घकालीन परिणाम नेमका काय झाला? तसेच अवैध धंद्यांचे मूळ उपटण्यासाठी कोणती प्रभावी रणनीती आखली गेली आहे का? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

Illegal Liquor Network
Bhimashankar Pilgrimage Facilities: भीमाशंकरमध्ये पर्यावरणपूरक सुविधांची गरज; भाविकांच्या सोयींसाठी नवा मार्ग

पूर्वीच्या दुर्घटनांमधून धडा घेतला का?

स्थानिकांच्या माहितीनुसार, सासवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वीही विषारी हातभट्टीच्या दारूमुळे अनेकांनी जीव गमावल्याच्या घटना घडल्या आहेत; मात्र, अशा घटनांनंतर काही दिवस कारवाया आणि चर्चांचा गाजावाजा होतो; त्यानंतर परिस्थिती पुन्हा पूर्ववत होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ग््राामीण भागात अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती अनेकदा पोलिस यंत्रणेला देण्यात आली होती; मात्र, अपेक्षित प्रमाणात कारवाई झालेली दिसून आली नाही, असा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर काही नागरिकांकडून पोलिस प्रशासनाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात असला, तरी अशा आरोपांची अधिकृत चौकशी आणि पुराव्यांच्या आधारेच सत्यता स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे या प्रकरणात निष्पक्ष तपास आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी जोर धरत आहे.

Illegal Liquor Network
Kedgaon Fetal Determination Racket Investigation: केडगाव गर्भलिंगनिदान रॅकेटचा तपास विस्तारला; आणखी तीन आरोपींची नावे उघड

पुरंदरहून पुण्याकडे दारूचा पुरवठा?

तालुक्यात तयार होणारी हातभट्टीची दारू पुणे शहरातील उरुळी कांचन, हडपसर आणि इतर उपनगरांमध्ये पुरवली जात असल्याची चर्चा स्थानिक स्तरावर आहे. बापदेव घाट, मरिआई घाट, चिव्हेवाडी घाट तसेच यवतमार्गे दुय्यम रस्त्यांचा वापर करून वाहतूक केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.दररोज मोठ्या प्रमाणावर दारूची वाहतूक होत असल्याच्या चर्चांनंतरही संबंधित यंत्रणांना त्याचा सुगावा लागत नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. जर हा प्रकार खरा असेल, तर स्थानिक आणि शहरी भागांमधील अवैध पुरवठा साखळीवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीका होत आहे.

कठोर कारवाईची अपेक्षा

पुणे जिल्ह्यातील विषारी दारूकांडाने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. अशा परिस्थितीत पुरंदर तालुक्यातील हातभट्टी व्यवसाय, त्यामागील साखळी, पुरवठा यंत्रणा आणि संभाव्य संरक्षण यांचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा प्रत्येक दुर्घटनेनंतर धाडी, चौकशा आणि आश्वासनांचेच चक्र सुरू राहील; मात्र अवैध दारूचा व्यवसाय कायम राहील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news