Shikrapur Illegal Liquor Raid: शिक्रापूर-सणसवाडीत पोलिसांचा धडाका; तीन दारूभट्ट्या उद्ध्वस्त, अनेकांवर गुन्हे

वेळ नदीकाठ आणि पाझर तलाव परिसरात छापेमारी; गावठी दारू निर्मिती व विक्रीविरोधात मोठी कारवाई
Liquor
LiquorPudhari
Published on
Updated on

तळेगाव ढमढेरे: शिक्रापूरचे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिक्रापूरसह सणसवाडी येथे वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत तीन दारूभट्‌‍ट्या उद्ध्वस्त केल्या असून, दोन दारू अड्ड्‌‍यांवर छापे टाकून गावठी दारू जप्त केली असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.

Liquor
Bhimashankar Pilgrimage Facilities: भीमाशंकरमध्ये पर्यावरणपूरक सुविधांची गरज; भाविकांच्या सोयींसाठी नवा मार्ग

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील वेळ नदीच्या कडेला वेगवेगळ्या ठिकाणी तसेच सणसवाडी येथे पाझर तलावाजवळ काही जण गावठी दारूची निर्मिती करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांना मिळाली.

Liquor
Kedgaon Fetal Determination Racket Investigation: केडगाव गर्भलिंगनिदान रॅकेटचा तपास विस्तारला; आणखी तीन आरोपींची नावे उघड

त्यानंतर गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक विजय मस्कर, वेरणनाथ मुत्तनवर, पोलिस हवालदार उद्धव भालेराव, गणेश करपे, सचिन होळकर, संदीप कारंडे, शिवाजी चितारे, राकेश मळेकर, ललित चक्रनारायण, विकास बांगर, शरद धूरपते, सुजीत जगताप यांनी शिक्रापूर व सणसवाडी येथे छापे टाकत तीन दारूभट्‌‍ट्यावर कारवाई करत तेथील गावठी दारूभट्‌‍ट्या उद्ध्वस्त केल्या. सणसवाडी येथील दोन दारू अड्ड्यांवर छापे टाकत गावठी दारूसाठा जप्त केला.

Liquor
Maharashtra Agriculture Crisis: ‘उत्तम शेती’ म्हण केवळ आठवणीत? संकटांच्या विळख्यात शेती, तरुणांचा वाढता दुरावा

याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी प्रेमशक्ती अभिमन्यू माननावत (वय 36, रा. सराटेवस्ती, सणसवाडी, ता. शिरूर), अंकुश नानावत (रा. सणसवाडी, ता. शिरूर), सोनी नीलेश परदेशी (वय 24, रा. भुजबळवस्ती, सणसवाडी, ता. शिरूर), रवी मोरसिंग बिरावत, किशोर राजकमल बिरावत,

Liquor
Bhigwan Bridge Road Damage: शिर्सूफळ-भिगवण मार्गावरील पुल धोकादायक; मोठी भगदाडे, प्रवाशांचा जीव मुठीत

जालिंदर शिलोन बिरावत, चिरोल कनू करमावत, कार्तिक चंदरसिंग करमावत, विश्वरुप ऊर्फ शाहरुक राजकमल बिरावत, देवानंद सोपान नानावत, वाल्मिक शिलोन बिरावत, किशोर राजकमल बिरावत, मुन्ना बिरावत (सर्व रा. शिक्रापूर, ता. शिरूर), दुर्बाल शिलोन बिरावत (रा. कासारी फाटा, ता. शिरूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news