गॅसची धोकादायक वाहतूक; धोक्याचा बावटा!

गॅसची धोकादायक वाहतूक; धोक्याचा बावटा!

चाकण : पुढारी वृत्तसेवा : तळेगाव- चाकण- शिक्रापूर महामार्गावर धोकादायक वाहतूक अव्याहतपणे सुरू आहे. अवजड वाहतुकीचे कंटेनर, ट्रेलर आणि गॅसची वाहतूक करणारे एलपीजी टँकर धोक्याचा बावटा दाखवीत आहेत. या रस्त्यावर टँकर उलटून गॅसगळती होणे आणि त्यातून भीषण प्रकार घडणे असे प्रकार अनेकदा घडत असल्याचे आजवर दिसून आले आहे.

एलपीजी टँकरची धोकादायक वाहतूक थांबावी यासाठी उरण ते चाकण-शिक्रापूर अशी भूमिगत एलपीजी गॅसवाहिनी कार्यान्वित करून ही धोकादायक वाहतूक कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी होत आहे. खेड तालुक्यातील महाळुंगे आणि रासे येथील गॅस प्लँटचे टँकर आणि सिलिंडरचे ट्रकही रहदारीस अडथळा ठरतात. ही वाहनेदेखील अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. एलपीजी टँकरमुळे होणारे अपघात तेवढ्यापुरतेच मर्यादित न राहता नागरी वस्तीलाही अत्यंत धोकादायक आहेत.

गोरखधंद्याला अभय कुणाचे?

कोणतीही पुरेशी सुरक्षितता न बाळगता बेकायदेशीर आणि धोकादायकपणे गॅस रिफिलिंग करण्याचा गोरखधंदा चाकण आणि महाळुंगे या औद्योगिक भागात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर अवैध गॅस साठा ठिकठिकाणी करण्यात येत आहे. संपूर्ण खेड तालुक्यात अनेक ठिकाणी गॅस रिफिलिंगचा बेकायदा धंदा सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. महिन्याला यातील हप्तेखोरीमधून मोठी उलाढाल होत असल्याने हा गोरखधंदा मागील काही वर्षांपासून सुरू आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news