नवी सांगवीतील बसस्थानकावर झाड पडल्याने नुकसान

नवी सांगवीतील बसस्थानकावर झाड पडल्याने नुकसान

पिंपळे गुरव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : नवी सांगवीतील बसस्थानकावर वादळीवार्‍यामुळे झाड उन्मळून पडले. त्यामुळे बसस्थानकाचे नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी सकाळी घडली; परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. गेल्या चार दिवसांपासून संततधार पावसामुळे नवी सांगवी, पिंपळे गुरव भागात झाडे कोलमडून पडण्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत . बसस्थानक, मुख्य चौकात जुनी झाडे पडत आहेत. त्यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता आहे. पालिका विभागाच्या संबंधित विभागाने लक्ष देऊन अशा झाडांची छाटणी करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news