पिंपळे गुरव : आकर्षक राख्यांनी सजल्या बाजारपेठा | पुढारी

पिंपळे गुरव : आकर्षक राख्यांनी सजल्या बाजारपेठा

पिंपळे गुरव; पुढारी वृत्तसेवा : राखी पौर्णिमेच्या सणानिमित्त नवी सांगवी, पिंपळे गुरव भागातल्या बाजार पेठांमध्ये विविध प्रकारच्या आकर्षक राख्या बाजारात विक्रीस उपलब्ध झाल्या आहेत. या राख्या खरेदीसाठी महिलांची लगबग सुरू झाली आहे. चांदीचा मुलामा दिलेल्या राख्यांना पसंती दुकानांमध्ये कुंदन, मिनार, रंगीत खड्याच्या राख्या साठ रुपयांपासून ते दोनशे रुपयेपर्यंत तर गोंडे राख्या दहा रुपयांपासून उपलब्ध आहेत. चंदन, ओम, स्वस्तिक, कलश ओम, मेरे प्यारे भैया अशी नावं कोरलेल्या नवीन राख्या ग्राहक वर्गाचे लक्ष वेधून घेत आहेत. चांदीचा मुलामा दिलेल्या राख्या पन्नास ते दीडशे रुपयांपर्यंत विक्रीस उपलब्ध आहेत.

राजस्थानी लुंबा राखीची क्रेझ

राजस्थानी लुंबा राखी नणंद आपल्या वहिनीला राखी पौर्णिमेला राखी बांधते. अशा सुंदर रंगीत धाग्यात गोंडे मोतींनी गुंफलेल्या लटकन लुंबा राखी विक्रीस उपलब्ध असून 30 पासून ते 140 रुपयांपर्यंत विक्रीस उपलब्ध आहेत.

बच्चेकंपनीसाठी कार्टून राख्या

बच्चेकंपनीला आकर्षित करण्यासाठी इडली, डोसा, ढोकळा, उत्तपा, पाणीपुरी आकाराच्या राख्याही विक्रीस आहेत. विमान, घड्याळ, विविध गाड्यांचा आकारातील राख्या आहेत. कार्टूनमध्ये मोटू पतलू, छोटा भीम, डोरो मोन,टेडी बिअर हनुमान तर संगीत आणि लायटिंग राख्यादेखील विक्रीस उपलब्ध आहेत. या सर्व प्रकारच्या राख्या 30 ते 120 रुपयांपर्यंत विक्रीस उपलब्ध असल्याचे राखी विक्रेत्या सविता माळी यांनी सांगितले.

हेही वाचा

लडाखमध्ये जगातील सर्वात उंचावरील रस्त्याचे काम सुरू

महावितरणचे 12 हजार मेगावॅटसाठी करार

सुपरस्टार रजनीकांत यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अखिलेश यादव यांची घेतली भेट

Back to top button