

पुणे; टीम पुढारी : माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती, वृत्तपत्र विक्रेता दिन व वाचन प्रेरणा दिन दै. 'पुढारी'च्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरासह उपनगरांतील विविध शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांनी दै. 'पुढारी'च्या अंकाचे सामूहिक वाचन केले. शाळा व्यवस्थापनांच्या वतीने वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कारही या वेळी करण्यात आला.
काही शाळांच्या प्रांगणात दै. 'पुढारी' व 'वाचाल तर वाचाल' या शब्दांच्या प्रतिकात्मक प्रतिकृती साकारून विद्यार्थ्यांनी वाचनसंस्कृतीचा जागर केला. अनेक विद्यार्थ्यांनी डॉ. अब्दुल कलाम यांची वेशभूषा केली होती. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा