Crime News : पूर्ववैमनस्यातून तरुणास मारहाण

Crime News : पूर्ववैमनस्यातून तरुणास मारहाण
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : जुन्या भांडणाच्या कारणावरून सहा जणांनी मिळून एका तरुणाला आणि त्याच्या नातेवाईकाला बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 30) रात्री साडेआठ वाजता खेड तालुक्यातील पाईट येथे घडली.राहुल नाथा अवारी (27, रा. पाईट, ता. खेड) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शिवाजी सावंत (रा. पाळू, ता. खेड), अमित हगवणे (रा. तळवडे, ता. खेड), तुषार वाळूंज (रा. तळवडे, ता. खेड), समीर ठोंबरे (रा. शेलू, ता. खेड), महेश कोळेकर (रा. धामणे, ता. मावळ), संकेत कोळेकर (रा. धामणे, ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल हे पाईट येथील एच पी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. तिथे ते त्यांच्या आतेभावासोबत बोलत थांबले. त्यावेळी इको गाडीतून आरोपी आले. शिवाजी सावंत याने राहुल यांना जुन्या भांडणाच्या कारणावरून
कोयत्याने मारहाण केली. त्यात राहुल यांच्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर आरोपींनी राहुल यांच्या आतेभावाला देखील मारहाण केली. महाळुंगे एमआयडीसी पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news