

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील विविध भागांतून आर एक्स हंड्रेड दुचाकींची चोरी करून ग्रामीण भागात विक्री करणार्या दोघांना विश्रामबाग पोलिसांनी तब्बल सव्वाचारशे सीसीटीव्ही कॅमेरे खंगाळून बेड्या ठोकल्या. तर चोरीच्या गाड्या विकत घेणार्या एकाला अटक केली आहे. त्यांच्याकडून साडेचार लाख रुपये किमतीच्या 17 दुचाकी जप्त केल्या आहेत. आदित्य दत्तात्रय मानकर (वय 19, रा. दातार कॉलनी, उरळी कांचन), मयूर ऊर्फ भैय्या पांडुरंग पवार (वय 20, रा. उरळी कांचन, बवरापूर रोड, तांबे वस्ती) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी विश्रामबाग, खडक, लष्कर, फरासखाना, अलंकार पोलिस ठाण्यांतील वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावला आहे.
पोलिस हवालदार हर्षल दुडम यांना दुचाकी चोरटे उरुळी कांचन येथील दत्तवाडी परिसरात असल्याचे समजले. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक राकेश सरडे यांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. जानेवारीतदेखील विश्रामबाग पोलिसांनी 17 दुचाकी जप्त केल्या होत्या. ही कामगिरी पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल, सहायक पोलिस आयुक्त वसंत कुवर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल माने, दादा गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक राकेश सरडे, पोलिस हवालदार हर्षल दुडम कर्मचारी मयूर भोसले, प्रकाश बोरूटे, महावीर वलटे, सागर गोंजारी, आशिष खरात, सत्तापा पाटील यांच्या पथकाने केली.
हे ही वाचा :