किरीट सोमय्या यांना काँग्रेसने दाखविले काळे झेंडे

किरीट सोमय्या यांना काँग्रेसने दाखविले काळे झेंडे

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  भाजप नेते किरीट सोमय्या बुधवारी पर्वती भागातील लक्ष्मीनगर येथील भाजपचे पुष्कर तुळजापूरकर यांच्याकडे जेवायला आले होते. त्या वेळी काँग्रेसने जोरदार निदर्शने केली. याच दरम्यान रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेले काही कार्यकर्ते अचानकपणे समोर आले. त्यांनी काळे झेंडे दाखवत सोमय्या यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची तारांबळ उडाली होती. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि.26) किरीट सोमय्या यांच्या निषेधार्थ घोषणा देऊन काळे झेंडे दाखवून निदर्शने केली. गाडीवर काळे झेंडे फेकणार्‍या काँग्रेसच्या चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोमय्या ज्या ठिकाणी आले आहेत, त्या इमारतीसमोरील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. शिंदे म्हणाले, की लज्जास्पद कृत्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकतात आणि सरकार अशांना सिक्युरिटी देते. त्यांना खरेतर ट्रिपल एक्स सिक्युरिटी दिली, तरी काँग्रेसचे त्यांच्या विरोधातील आंदोलन सुरूच राहील. सोमय्या घृणास्पद कृत्य करून निर्लज्जपणे जेवणावळी झोडायला पुण्यात आले. त्यांना प्रत्येक ठिकाणी असाच आक्रमकपणे विरोध दर्शविला जाईल. माजी महापौर कमल व्यवहारे, संगीता तिवारी, अजित दरेकर, रफीक शेख, सुजित यादव आदी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news