मुंबई : गुरुवारी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर; ११ वी प्रवेशालाही मुदतवाढ

File Photo
File Photo

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : भारतीय हवामान खाते मुंबई यांनी बुधवारी (दि. २६) रात्री आठ ते गुरुवार दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन, पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबईतील पालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना गुरुवारी (दि. २७) जुलैला सुट्टी जाहीर केली आहे.

११ वी प्रवेशाला मुदतवाढ

मुंबई आणि परिसरात उद्या जोरदार पावसाचा इशारा दिल्याने शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ११ वी ऑनलाईन प्रवेशालाही मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष फेरी १ नुसार प्रवेश घेण्यासाठी गुरुवारी (दि. २७) अखेरचा दिवस होता. मात्र सुट्टी दिल्याने प्रवेश घेण्याची मुदत शुक्रवार (दि. २८) पर्यंत वाढविण्यात आली आहे, असे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने स्पष्ट केले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news