हिंजवडी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मुंबई-बंगळुरू द्रुतगती महामार्गावर शनिवारी (दि. 29) मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. अवजड आणि चारचाकी वाहनांची दुपारनंतर मोठी गर्दी पाहायला मिळत होती. परिणामी वाकड येथील भुजबळ वस्ती, सुसू-पाषाणरोड, चांदणी चौकापर्यंत वाहनांची गर्दी झाली होती.
यामुळे नागरिक आणि वाहनचालक यांना मोठा त्रास सहन करावा लागला. शनिवारी, रविवारच्या विकेंडमुळे सातारा, बंगळुरूमार्गे जाणार्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असते. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूककोंडी झाल्याने तासन्तास वाहने महामार्गावर अडकून पडली होती. यासह ठिकठिकाणी वाहतूक वळवली असल्यानेदेखील महामार्गावर अधिकचा ताण आला होता. अशा परिस्थितीमध्ये या रस्त्याचा वापर नागरिक करतात.
दिवसभर कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्याने वाहतूक संथ गतीने सुरू होती. त्यामुळे वाहनचालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा