पोलिस आयुक्त रितेश कुमार विद्यार्थी वाहतूक जिल्हा सुरक्षितता समितीच्या बैठकीत बोलत होते. या वेळी पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. मितेश घट्टे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर आदी उपस्थित होते. पोलिस आयुक्त कुमार म्हणाले, विद्यार्थ्यांची घर ते शाळेदरम्यानच्या वाहतुकीत अपघात किंवा इतर प्रकारे जीवितास, शारीरिक, मानसिक धोक्याच्या घटनांना प्रतिबंध व्हावा, यासाठी स्कूल बस नियमावलींचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. स्कूल बसमध्ये मदतनीस (अटेंडन्ट), मुलींची वाहतूक होणार्या स्कूल बसमध्ये महिला मदतनीस असणे बंधनकारक आहे.